30 C
Mumbai
Thursday, June 23, 2022
घरक्राईमनामाअवंतीपोरामध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

अवंतीपोरामध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Related

जम्मू- काश्मीरमधील अवंतीपोरा येथे आज, ३१ मे रोजी सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. यामध्ये सुरक्षा दलाला मोठ यश आलं असून दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. शाहिद राथर आणि उमर युसूफ अशी दोघांची नावे असून काही शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. जम्मू- काश्मीर पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आहे.

अवंतीपोरा या परिसरात दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सुरक्षा दलाने शोधमोहीम हाती घेतली होती. दरम्यान दहशतवाद्यांकडून गोळीबाराला सुरुवात झाली. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून महिलेने सहा मुलांना ढकलले विहिरीत

समीर वानखेडेंची चेन्नईला बदली

साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीला लवकरच शिक्षा

मरिन लाईन्स समुद्रात इसमाची आत्महत्या

शाहिद राथर हा त्रालचा रहिवासी होता तर उमर युसूफ हा शोपियानचा रहिवासी होता. यांच्याकडून दोन AK 47 आणि काही आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहिद राथर हा शकिला आणि सरकारी कर्मचारी जविद अहमद यांच्या हत्येच्या कटात सामील होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,937चाहतेआवड दर्शवा
1,920अनुयायीअनुकरण करा
10,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा