पंढरीची वारी ही केवळ एक धार्मिक यात्रा नाही, तर ती महाराष्ट्राच्या ८०० वर्षांहून अधिक जुन्या हिंदू परंपरेचा, भक्तीचा आणि सामाजिक एकात्मतेचा जिवंत अविष्कार आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्यासारख्या महान संतांनी या परंपरेला एका अशा उंचीवर नेले, जिथे जात, पंथ किंवा सामाजिक स्तराचा कोणताही भेद उरत नाही. लाखो वारकरी ‘माऊली’ या एकाच नात्याने विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने शेकडो किलोमीटरची पायपीट करतात, मात्र ही सहिष्णु आणि सर्वसमावेशक हिंदू परंपरा आज एका ढोंगी आणि कपटी आक्रमणाचा सामना करत आहे.
एकीकडे काही मुस्लिम आणि ख्रिस्ती संघटना वारकऱ्यांच्या मार्गात पाणी आणि अन्न वाटून ‘सेक्युलॅरिझम’ आणि ‘सामाजिक सलोख्या’चा देखावा निर्माण करतात. या कृतीला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी देऊन एक सकारात्मक वातावरण निर्माण केले जाते, ज्यामुळे हिंदू समाज गाफील राहतो. पण याच सेवेच्या मुखवट्याआड मुस्लीम हे हिंदू श्रद्धेवर हल्ले करतात. पुण्यामध्ये नसीमा शेख या मुस्लिम महिलेने वारकऱ्यांवर मांसाचे तुकडे फेकून त्यांच्या श्रद्धेची विटंबना केली. ख्रिस्ती मिशनऱ्यांनी व्यसनमुक्तीच्या नावाखाली बायबलची पत्रके वाटून धर्मांतराचा अजेंडा राबवला. हा विरोधाभास म्हणजे एक दुहेरी रणनीती आहे. एका बाजूला सेवेचे ढोंग करून विश्वास संपादन करायचा आणि दुसरीकडे त्याच विश्वासाचा गैरफायदा घेऊन हिंदू धर्माच्या मुळावर घाव घालायचा.
