देशभरात दिवाळीचा उत्साह असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दिवाळीनिमित्त देशवासीयांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. प्रकाशाचा सण लोकांच्या जीवनात सुसंवाद, आनंद आणि समृद्धी आणो अशी इच्छा व्यक्त केली आहे. नरेंद्र मोदींनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “दिवाळीच्या शुभेच्छा. प्रकाशाचा हा सण आपल्या जीवनात सुसंवाद, आनंद आणि समृद्धी आणो. आपल्या सभोवताली सकारात्मकतेची भावना कायम राहो.”
सभी देशवासियों को दीपावली की हार्दिक शुभकामनाएं। प्रकाश का यह पावन पर्व हर किसी के जीवन को सुख-समृद्धि और सौहार्द से आलोकित करे, यही कामना है।
— Narendra Modi (@narendramodi) October 20, 2025
यासोबतच पंतप्रधान मोदींनी भारतीय ग्राहकांना या महोत्सवादरम्यान देशांतर्गत बनवलेल्या स्वदेशी उत्पादनांची खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. भारतीय बनावटीच्या वस्तूंच्या खरेदीला प्रोत्साहन देत; स्थानिक कारागिरांना पाठिंबा दिला. तसेच त्यांनी जनतेला आवाहन केले की, १४० कोटी भारतीयांच्या कठोर परिश्रम, सर्जनशीलता आणि नवोपक्रमाचा उत्सव साजरा करून हा सण साजरा करूया. भारतीय उत्पादने खरेदी करूया आणि गर्वाने म्हणा की हे स्वदेशी आहे. तुम्ही जे खरेदी केले ते सोशल मीडियावर देखील शेअर करा. यामुळे इतर लोकही प्रेरित होतील, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही शुभेच्छा दिल्या आणि म्हटले की, “दिवाळीच्या शुभ प्रसंगी, भारतातील आणि जगभरातील सर्व भारतीयांना मनापासून शुभेच्छा.” केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुभेच्छा देताना म्हटले आहे की, “प्रकाश आणि आनंदाच्या या सणाच्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मी सर्वांच्या आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी भगवान श्री रामांकडे प्रार्थना करतो.”
हे ही वाचा:
ऑटोमोबाइल निर्यात १६.८५ लाख युनिट्सच्या पलीकडे
देशाचा निर्यात दर गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक
दरम्यान, दीपोत्सवाच्या पूर्वसंध्येला, अयोध्येमध्ये २६ लाखांहून अधिक तेलाचे दिवे लावून आणि आतापर्यंतची सर्वात मोठी शरयू आरती आयोजित करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यात आले. हा कार्यक्रम उत्तर प्रदेश पर्यटन विभागाने अयोध्या जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आयोजित केला होता. तेलाच्या दिव्यांच्या सर्वात मोठ्या प्रदर्शनात, शरयू नदीच्या काठावर २६,१७,२१५ दिवे पेटवण्यात आले.







