30 C
Mumbai
Saturday, November 15, 2025
घरविशेषदिव्यांगांचे सशक्तीकरण: आत्मनिर्भरतेच्या प्रवासाला गती

दिव्यांगांचे सशक्तीकरण: आत्मनिर्भरतेच्या प्रवासाला गती

मुख्यमंत्र्यांकडून ई-रिक्षा वाटप

Google News Follow

Related

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर येथे प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्याकरिता ई-रिक्षा वाटप करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आज जवळपास ५०० दिव्यांग लाभार्थ्यांना पारदर्शी लॉटरी प्रक्रियेने आणि वैद्यकीय तपासणीनंतर ई-रिक्षा देण्यात आल्या. या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात मोठा बदल घडून येणार असून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्यासाठी त्यांना एक भक्कम आधार मिळाला आहे.

यासोबतच आज ‘स्ट्रीट फूड’ व्यवसायासाठी आवश्यक सर्व साहित्याने सज्ज असलेल्या गाड्यांचे वाटप करण्यात आले. कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जातीतील भूमिहीनांना शेतजमीन वाटपाचा निर्णय पुन्हा सुरू करण्यात आला असून त्याचाही लाभ यावेळी देण्यात आला. अंगणवाडी सेविका व त्यांच्या मदतनीस आणि आरोग्यविभागातील आशा वर्कर्स यांना सायकल वाटप करून त्यांच्या दैनंदिन कार्यात गती आणि सुलभता निर्माण करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित घटकासाठी जी दूरदृष्टी दाखवली त्यानुसार समाजातील वंचित घटकांना रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत हक्काची घरे देण्याचे काम सुरू असून आजचा हा कार्यक्रम संविधानाने अपेक्षित केलेल्या शेवटच्या माणसाच्या विकासाच्या संकल्पनेला साजेसा आहे. या माध्यमातून लाभार्थ्यांना स्वाभिमानाने स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

हे ही वाचा : 

पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना भारतीय उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन, म्हणाले– “गर्वाने सांगा, हे स्वदेशी आहे.”

राज ठाकरेंचे हातपाय का गळाले?

लौकीचा रस प्यायल्याने हृदयाचे आरोग्य टिकते

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, संविधानच प्रत्येक नागरिकाच्या जीवनात परिवर्तन घडवून भारताला महासत्ता बनवू शकते. म्हणूनच संविधान अर्पण दिनानिमित्त आपण संविधानाची प्रस्ताविका प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे. संविधानाचे महत्त्व जनमानसात रुजवण्यासाठीच घर घर संविधान ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे.

यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ. आशिष देशमुख, आमदार डॉ. परिणय फुके व इतर मान्यवर उपस्थित होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
281,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा