प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासात गेले, तेव्हा त्यांच्यातील समजूतदारपणा आणि समरसता वाखाणण्यासारखी होती. वनवासात असताना सुद्धा ते, त्यांना प्रत्येक पावलावर जे लोक भेटत असत, त्यांना आपलंसं करून घेत असत. इतकच नाही तर तेथील लोकांना सांगतही असत की, सगळ्यांनी एकत्र रहा, जाती जातींमध्ये भेदभाव करू नका, कोणाशीही भांडण तंटा करू नका. एकत्र रहाल तरच तुम्हाला कोणी त्रास देणार नाही. प्रत्येक माणूस बाहेरून जरी वेगळा असेल तरी सगळ्यांचा आत्मा एक आहे. त्यामुळे जाती जातीत काहीही भेद नाही. हल्ली बाहेरच्या देशातून लोक येतात आणि आपल्या लोकांना भडकवतात आणि आपल्या समाजाला आणि राष्ट्राला तोडण्याचा प्रयत्न करतात. मोठ्या हुशारीने लोकांमध्ये जाती आणि धर्म यांच्यामध्ये फरक दाखवून वैमनस्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी श्रीरामचंद्रानी समरसतेसाठी काय केले ते जाणण्याची आपल्याला आवश्यकता पडते.
रामायण हे संस्कृत भाषेतील सर्वप्रथम महाकाव्य
वाल्मिकींनी संस्कृत भाषेत लिहिलेले रामायण सर्वात जुने मानले जाते. संस्कृत भाषेतील पहिल्या महाकाव्याच्या रचनेमुळे महर्षी वाल्मिकी यांना आदिकवी असेही म्हणतात. महर्षी वाल्मिकींच्या जयंतीनिमित्त देशभरात अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात, मंदिरांमध्ये वाल्मिकीची पूजा केली जाते. महर्षी वाल्मिकीजींचे नाव आणि ते महर्षी बनण्याची कथा खूप मनोरंजक आहे. चला जाणून घेऊया वाल्मिकीजींशी संबंधित काही महत्त्वाची माहिती…
आधी लुटारू…नंतर महर्षी वाल्मिकी
महर्षी वाल्मिकींच्या जन्माबाबत कोणताही ठोस पुरावा नाही. काही मान्यतेनुसार, महर्षि कश्यप आणि अदिती यांचा नववा मुलगा वरुण आणि त्याची पत्नी चारशनीच्या पोटी त्यांचा जन्म झाला. असे म्हणतात की, जन्मानंतर त्यांना भिल्ल समाजातील लोकांनी बालपणीच पळवून नेले, त्यानंतर ते भिल्ल समाजात वाढले आणि नंतर त्यांचे नाव ‘वाल्या’ पडले आणि सर्व लोक त्यांना ‘वाल्या कोळी’ म्हणू लागले. कुटुंबाचे पोट भरण्यासाठी तो लोकांना लुटायचा.
या घटनेनंतर रत्नाकर महर्षी वाल्मिकी झाले
असे म्हणतात की, एकदा वाल्या डाकूने नारद मुनींना जंगलात कैद केले होते, तेव्हा नारदाने विचारले की या चुकीच्या कृतीतून तुम्हाला काय मिळणार आहे? रत्नाकर म्हणाले, मी हे कुटुंबासाठी करतो. नारदाने त्यांना सांगितले की, तू त्याच्यासाठी चुकीच्या मार्गावर चालला आहेस, तुझ्या पापकर्माचे फळ तुला मिळेल. नारदाचे म्हणणे ऐकून रत्नाकरांनी आपल्या घरच्यांना विचारले. परंतु, कुटुंबातील सर्वांनी तसे करण्यास नकार दिला. या घटनेने रत्नाकर अत्यंत दु:खी झाला आणि त्याने चुकीचा मार्ग सोडून रामाच्या भक्तीत मग्न झाला. यानंतरच त्यांना रामायण रचण्याची प्रेरणा मिळाली.
हे ही वाचा:
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना – उत्तर मुंबईकडून बळीराजाला मदतीचा हात
दंत शस्त्रक्रिया पदवीधारक तरुणाची अमेरिकेत गोळी घालून हत्या!
रशियाचा युक्रेनच्या प्रवासी ट्रेनवर हल्ला; ३० जखमी
रोहित शर्माऐवजी वनडे संघाची सूत्रे आता शुभमन गिलकडे
वाल्मिकी हे नाव कसे पडले?
मान्यतेनुसार, एकदा वाल्मीकी तपश्चर्येला बसले होते. बराच वेळ चाललेल्या या तपस्यामध्ये तो इतका तल्लीन झाले होते की त्याच्या संपूर्ण शरीराला वाळवी लागली. पण त्यांनी तपश्चर्येत भंग न आणू घेता अध्यात्मिक साधना सुरू ठेवली. तेव्हाच त्यांनी डोळे उघडले. असे म्हटले जाते की, ज्या ठिकाणी वाळवी आपले घर बनवते त्याला वाल्मिकी म्हणतात, म्हणून ते वाल्मिकी म्हणून ओळखले जाऊ लागले. वाल्मिकी ऋषींना आदी कवी किंवा प्रथम कवी म्हणून संबोधले जाते. संस्कृत साहित्य परंपरेतील पहिले महाकाव्य मानले जाणारे रामायण रचण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. रामायणाचे वर्णन नेहमीच ‘पहिली साहित्यिक रचना’ असे केले जाते.
रामायणातील बाल आणि उत्तरकांडातील वाल्मिकी
‘वाल्मिकी रामायण’ हे सात कांडांमध्ये विभागलेले आहे. प्रत्येक भाग भगवान रामाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगावर प्रकाशझोत टाकतो. बालकांड हा प्रारंभिक भाग तर उत्तरकांड हा शेवटचा भाग आहे. बालकांडाची सुरुवात ही वाल्मिकी ऋषी आणि नारद मुनींच्या संवादाने होते. या जगात कोणी नीतिमान मनुष्य शिल्लक आहे का? असा प्रश्न वाल्मिकी ऋषी नारदमुनींना विचारतात. तेव्हा नारद उत्तरादाखल राम हे नाव घेतात. त्यानंतर वाल्मिकी आपले कथन सुरू करतात. तर उत्तरकांडात रामांनी सीतेचा त्याग केल्यानंतरच्या प्रसंगाचे वर्णन येते. सीतेला वाल्मिकींच्या आश्रमात आश्रय लाभतो आणि तिथे ती जुळ्या मुलांना जन्म देते. हीच दोन जुळी मुले म्हणजे लव आणि कुश वाल्मिकींचे शिष्य होतात. बालकांडात वाल्मिकी आपल्या शिष्यांना रामाची कथा कथन करतात.
सामाजिक समता
रामायण या महाकाव्याचा विचार करताना सामाजिक समतेचा आणि समावेशकतेचा संदर्भ फार महत्त्वाचा आहे. हे महाकाव्य जरी प्राचीन भारतात घडत असलं, तरी वाल्मीकि यांनी त्यांच्या लेखनातून अनेक ठिकाणी समतेचे, सर्वसमावेशकतेचे आणि धर्मनिष्ठतेचे दर्शन घडवले आहे.
वाल्मीकि हे केवळ कवी नव्हते, तर एक नैतिक दृष्टी देणारे चिंतक होते. त्यांच्या रामायणात समाजातील विविध घटकांना स्थान मिळालं आहे — केवळ उच्चवर्णीय नाही, तर आदिवासी, वनवासी, राक्षस, वानर अशा सर्वांचा सन्मानाने समावेश आहे.
नीतिमूल्यांना मान्यता
रामायण मधील अनेक पात्रांचा सन्मान त्यांच्या कर्माने ठरतो — जन्मावरून नव्हे. भक्ती, निष्ठा, सत्य, करुणा या मूल्यांवर राम आणि त्याचे सहकारी आधारलेले दिसतात. उदा. हनुमान, शबरी, गुह — हे सर्व पात्र त्यांच्या वंशामुळे नाही, तर त्यांच्या गुणांमुळे महत्त्वाची ठरतात.
त्रेता युगामध्ये महर्षी वाल्मिकी यांनी रामायण ग्रंथाची रचना केली. या ग्रंथाच्या आधारे गोस्वामी तुलसीदास यांनी श्रीरामचरितमानास ग्रंथाची रचना केली. रामायणात श्रीराम आणि रावणाच्या कथा माध्यमातून वाल्मिकी यांनी सुखी आणि यशस्वी जीवनाचे विविध सूत्र सांगितले आहेत. या सूत्रांचे पालन केल्यास आपण विविध अडचणींपासून दूर राहू शकतो. येथे जाणून घ्या, रामायणात सांगण्यात आलेले असेच काही सूत्र…
१. या जगात कोणतेच काम अवघड नाही, जर उत्साहाने काम केले तर अवघडातील अवघड कामही यशस्वी होऊ शकते.
२. चंदनाचे लाकूड शीतलता प्रदान करते, परंतु हे लाकूड एकमेकांवर रगडल्यास यामध्ये आग लागते ठीक अशाचप्रकारे खूप अवज्ञा झाल्यास ज्ञानी लोकांनाही क्रोध येतोच.
३. संत समाजाला दुःखापासून दूर ठेवण्यासाठी कष्ट करतात याउलट दुष्ट लोक इतरांना दुःख देण्यासाठी संघर्ष करत राहतात.
४. दुःख आणि अडचणी जीवनातील असे दोन पाहुणे आहे, जे आमंत्रणाशिवाय येत राहतात.
५. आपल्या जवळपास कठोर बोलणारे लोक फार कमी असतात परंतु हे लोक नेहमी आपल्या हिताचे सल्ले देतात.
६. जीवनात नेहमी सुखच मिळावे हे आवश्यक नाही, कधीकधी दुःखही येत राहतात.
७. आपला अहंकारच आपला सर्वात मोठा शत्रू आहे. ही भावना सोन्याचा हारही मातीचा बनवून टाकते. रावणाचा अहंकारामुळेच प्रभू श्रीरामाकडून अंत झाला.
८. आपली इच्छाशक्ती मजबूत असल्यास आपण कोणतेही काम सहजपणे पूर्ण करू शकतो.
९. जननी आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षा मोठी आहे. यामुळे आई आणि मातृभूमीचा नेहमी सन्मान करावा. १०. नीच लोकांची नम्रता खूप दुःखदायी असते. ज्याप्रकारे अंकुश, धनुष्य, साप आणि मांजर वाकूनच वार करतात.
रामायण हे एक महाकाव्य आहे. हजारो वर्षे लोटली, तरी या काव्याचा, यातील प्रसंगांचा, तत्त्वांचा प्रभाव अद्यापही ओसरलेला दिसत नाही. याउलट दिवसेंदिवस त्याविषयीची गोडी वाढत चालल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्रेतायुगात महर्षी वाल्मीकि यांनी लिहिलेले रामायण प्रमाण मानले जाते.
महर्षी वाल्मीकिंना तपस्वी, मुनिपुंगव, द्विज अशी विशेषणे रामायणामध्ये योजलेली आढळतात. वाल्मीकिच्या रामायणाने अलंकृत, अभिजात महाकाव्याचा आदर्श निर्मिला असल्याचे दिसून येते. वाल्मीकिंच्या काव्यप्रतिभेने संस्कृत साहित्य बहरले. आधुनिकांनाही स्फूर्ती मिळाली. ‘आदिकवी’ या गौरवातच वाल्मीकिंची थोरवी सिद्ध होते, असे म्हटले जाते. तसेच वाल्मीकिंच्या नावावर वाल्मीकिसूत्र, वाल्मीकिशिक्षा, वाल्मीकिह्रदय, गंगाष्टक आदी रचना आढळतात.
सबुरी ठायी आहे राम
शबरीची ऊष्टी बोरे खाऊन रामाने दाखवून दिले की, सगळी माणसे एक आहेत. रामाच्या जीवनातील १४ वर्षे वनवासतच गेली. जंगलातील जनजातीय , भिल्ल आणि वानरांबरोबर एकत्र होऊन रावणाचा त्याच्या कुळासहित नाश केला. साधू, संत, तपस्वी, या सगळ्यांना रामाने आपले अंग मानले. त्यांच्यावर प्रेम केले त्या लोकांना आपले भाऊ मित्र मानले. वनातील सगळ्या लोकांवर प्रेम केले त्यामुळे हनुमान, सुग्रीव, अंगद, जांबुवंत यांच्यासारख्या मनात राहणाऱ्यांबरोबर ते अगदी समरसून गेले.
प्रत्येक पावला पावलावर श्रीरामचंद्राने एकता आणि समरसतेचा संदेश दिला. रामाने आपल्या समरसतेतून राक्षस वृत्ती नष्ट करून समाजाला निर्भय बनवले आणि त्यांना जीवनाचा चांगला मार्ग दाखवून दिला. त्यामुळेच समाजातील भिन्न भिन्न प्रकारचे लोक एकत्र येऊ लागले. भारताची समृद्धी आणि संस्कृती टिकवण्यासाठी श्रीरामचंद्र कारणीभूत झाले आहेत. त्यांनी जनजातीय, कातकरी, भिल्ल अशा अनेक जातीतल्या लोकांना आपल्याच परिवारातले समजून त्यांचे मन जिंकून घेतले. गिधडांचा राजा जटायू याचा अंतिम संस्कार प्रभूनी स्वतःच्या हाताने केला. तसेच अपराधांच्या ओझ्याखाली दबलेल्या कैकयी मातेला कौशल्या मातेपेक्षा जास्त प्रेम आणि मान देऊन त्यांना अपराधाच्या ओझ्यातून मुक्त केले.
भावा-भावांमध्ये प्रेम निर्माण केले. त्यांना आनंद मिळवून दिला. ऋषींमध्ये जी विरुद्ध मते होती ती मते बदलून त्यांच्या मतांमध्ये एकता निर्माण केली, त्यांच्यात चेतना निर्माण केली, जागृती निर्माण केली. संपूर्ण भारत सगळ्या महाशक्ती ना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. युद्धात सुद्धा प्रभू रामचंद्रांच्या मार्गाचे अनुकरण करू लागले आहेत. जेव्हा केव्हा संकटात येतील तेव्हा प्रभु रामचंद्रांची आठवण काढू लागले आहेत. शक्तीने सगळं साध्य करता येत असं नाही, तर संयम पाळल्यानेही सगळं साध्य होतं. प्रभू रामचंद्र खूप शक्तिशाली होते. तरीही पाण्यातून मार्ग काढण्यासाठी ते समुद्राची प्रार्थना करायचे तेव्हा समुद्र त्यांच्या विनंतीला धुडकावून लावायचा. तेव्हा फक्त रामचंद्र आपल्या शक्तीचा उपयोग करायचे.
प्रभू रामचंद्रांनी अशी शिकवण दिली आहे की, समाजातली माणसं जर एकत्र चालली तर कितीही मोठे संकट आले तरी आपण ते निभावू शकतो. त्यामुळे आपण दुर्बल होत नाही आणि कोणीही आपल्याला वाकवू शकत नाही आणि कोण जर आपल्याला त्रास देत असेल तर त्याला कठोर शिक्षा करावी.
बलीचा नाश केल्यानंतर श्रीराम सुग्रीवाला किशकिंधाचे राज्य देतात. बलिपुत्र अंगदला त्याचा उत्तराधिकारी घोषित करतात. श्रीराम लंकेत त्यांचा विजय झाल्यावर लक्ष्मणाला सांगून बिभीषणाचा राज्याभिषेक करतात. तसेच बिभीषणाच्या घरातील सगळ्या बायकांचे सांत्वन करतात. प्रभू रामचंद्र अपराध्याला शिक्षा करतात. पण जो पराजित झाला असेल त्याचे धन संपत्ती राज्य याचा कधीही मोह ठेवत नाहीत.
बिभीषण लाजेने त्याचा भाऊ रावण याच्या शवाचा अंतिम संस्कार करत नाही, तेव्हा श्रीराम सांगतात “तू त्याचा अंतिम संस्कार कर”. जीवन असेपर्यंतच वैर ठेवावे त्या माणसाच्या मृत्यूनंतर वैराचा अंत होतो. रामचंद्रांचा जन्म कोणाची ही हत्या करण्यासाठी झालेला नव्हता रावणा सारख्या दुष्ट राक्षसाला समाप्त करण्यासाठी त्यांचा जन्म झाला होता. हे श्रीरामांचे आदर्श सगळ्या जगाला सुखमय करतात सगळ्यांना सन्मानपूर्वक जीवन देतात.
रामराज्य
पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, चित्त, बुद्धि आणि अहंकार यांच्यावर हृदयातील रामाचे (आत्मारामाचे) राज्य असणे, हे खरे रामराज्य होय, असे संतांचे सांगणे असते. रामाशिवाय भारतीय जीवनात ‘राम’ नाही. आपण स्वत:ला हिंदू म्हणतो, ‘गर्व से कहो हम हिंदू है’ असे म्हणतो. हे हिंदूपण आम्हाला भगवान वाल्मिकींनी दिले, त्यांच्या रामायणाने दिले. हे वाल्मिकींचे सामर्थ्य ईश्वरी शक्तीचे सामर्थ्य आहे.शब्द तोकडे पडावेत इतके रामायणाचे सामर्थ्य अफाट,अनन्यसाधारण आहे.







