ऑपरेशन सिंदूरच्या यशामुळे काँग्रेसची कशी आग आग होते आहे, याची प्रचिती आता वारंवार येऊ लागली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख मामूली घटना असा केला आहे. गेली अनेक वर्षे ज्यांना लोकसभा जिंकता आली नाही, विधानसभा निवडणुकांमध्ये ज्यांचा सातत्याने पराभव होतो आहे. महापालिका निवडणुकांमध्ये जे माती खातायत अशा पक्षाच्या पडेल अध्यक्षाने भारतीय सेनादलांच्या भीम पराक्रमाला मामुली
घटना म्हणून काळोखी फासण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मौलाना जनरल आसिफ मुनीर यांनी अलिकडेच स्वत:ची फिल्ड मार्शलपदी पदोन्नती करून घेतली. सतत मार खाऊन किंवा पराभूत होऊन फिल्ड मार्शल
पद मिळत असेल तर तसे एखादे पाकिस्तानी फिल्ड मार्शल पद राहुल गांधीकिंवा मल्लिकार्जुन खरगे यांनाही द्यायला हरकत नाही.
काँग्रेसचे केवळ कर्तृत्व रसातळाला गेले आहे, अशातला भाग नाही. नैतिकदृष्ट्याही हा पक्ष साफ दिवाळखोर झालेला आहे. भाजपा विरोध आणि देशविरोध यात त्यांना फरक दिसेनासा झालेला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशाची चर्चा सगळ्या जगात आहे. भारताने पाकिस्तानला असा काही दणका दिलेला आहे की पाकिस्तानचे राजकीय नेते, लष्करशहा आपले मिलिटरी हेडक्वाटर रावळपिंडी येथून इस्लामाबादला हवलण्याचा विचार करीत आहेत. रावळपिंडी इस्लामाबादमध्ये काही फार मोठ अंतर नाही. ही जुळी शहरे आहेत. परंतु इस्लामाबाद ही राजधानी असल्यामुळे तिथे देशोदेशीचे दूतावास आहेत. त्यामुळे
इथे क्षेपणास्त्रांचे हल्ले करताना भारत विचार करेल, असा पळपुटा हिशोब या निर्णयामागे आहे.
भारतात निर्मिती झालेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रासाठी, आकाशतीर हवाई संरक्षण प्रणाली खरेदी करण्यासाठी सौदी अरेबियापासून व्हीएतनामपर्यंत अनेक देशांच्या रांगा लागल्या आहेत. सेनादलांचे युद्धकौशल्य, शस्त्रास्त्रांची मारक क्षमता, राजकीय नेतृत्त्वाचा खंबीरपणा सगळ्याचेच जगात कौतूक होत असताना काँग्रेस नेत्यांच्या पोटात मात्र जबरदस्त मुरडा आलेला आहे.
गेली ११ वर्षे देशात मोदी सरकार आहे. मोदींनी सत्तेवरून हटवण्यासाठी काँग्रेसने जंग जंग पछाडले. परंतु मोदींची सत्तेवर पकड कमी होताना दिसत नाही. त्यांचा प्रभावही कमी होताना दिसत नाही. हा प्रभाव ही काँग्रेसची समस्याही आहे आणि
डोकेदुखीही आहे. त्यामुळे हा प्रभाव जेव्हा जेव्हा वाढतो, तेव्हा तेव्हा काँग्रेसचे नेते अस्वस्थ होतात. देश विदेशात जाऊन गरळ मोदींच्या विरोधात गरळ ओकत असतात. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे मेरूमणी आहेत. मोदींच्या विरोधात
त्यांची भाषा कायम शेलकी असते. त्यामुळे त्यांच्या पक्षातील चाटुकार राहुल गांधी यांना प्रसन्न करण्यासाठी कायम मोदींच्या विरोधात शेलक्या भाषेचा प्रयोग करीत असतात.
पहेलगाम हल्ल्यानंतर मोदींनी दहशतवादी आणि त्यांच्या आश्रयदात्यांच्या विरोधात गर्जना केली. सुरूवातीला त्यांनी काही पावले उचलली. पाकिस्तानी प्रपोगंडा बंद करण्यासाठी आदी पाकिस्तानी यूट्यब चॅनल, इन्स्टाग्राम अकाऊंटवर कुऱ्हाड चालवली. काँग्रेसच्या शिवराळ प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी या मुद्द्यावरून मोदींची खिल्ली उडवली होती. मोदी या पलिकडे जाऊन काही करू शकणार नाही, असा विश्वास या खिल्लीच्या मागे होता. प्रत्यक्षात ७ मे पासून नरेंद्र मोदी यांनी तांडव सुरू केले. चार दिवसात पाकिस्तानचा बाजार उठवला. चार दिवसात ११ हवाई तळ, दहशतवाद्यांचे २१ तळ आपण उद्ध्वस्त केले. पेंटागॉनचा माजी अधिकारी मायकल रुबिन, तसेच डेरेक ग्रासमन, टॉम कूपर, जॉन स्पेन्सर अशा अनेक संरक्षण विश्लेषकांनी भारताच्या युद्ध कामगिरीचे तोंडभरून कौतूक केले. परंतु काँग्रेस नेत्यांच्या मडक्यात यातले
काहीच शिरले नाही. कारण त्यामध्ये केवळ मोदींबाबतचा द्वेष भरलेला आहे.
खरगेंचे हे निवृत्तीचे वय आहे. चाटुकारिता करून पदावर टिकून राहण्याची त्यांची धडपड असते. मोदींच्या विरोधात बरळले की राहुल गांधी खूष राहतात, हा त्यांचा अनुभव असल्यामुळे ते कायम मोदींच्या विरोधात बडबडत असतात. परंतु मोदींचा विरोध आणि देश विरोध यातली सीमारेषा आता त्यांना कळेनाशी झालेली आहे.
खरगेंचे ताजे विधान भारताचे संरक्षण करणाऱ्या सेनादलांच्या विरोधात आहे. ज्यांनी ७ ते १० मे दरम्यानच्या संघर्षात भारतीयांच्या जीविताचे, भारतीय सीमांचे रक्षण करण्यासाठी प्राणांची बाजी लावली. ऑपरेशन सिंदूरचे यश त्यांना
मान्य करायचे नाही. कारण ते मान्य केले तर त्याचे श्रेय मोदींनाही द्यावे लागले. ते देण्याची काँग्रेसची तयारी नसल्यामुळे ते लष्करालाही झोडायला तयार आहेत. ऑपरेशन सिंदूर ही मामूली घटना आहे, असे काँग्रेसचा अध्यक्ष म्हणतो. काँग्रेसचे रणनीतीकार, राहुल गांधी यांचे मुख्य सल्लागार जयराम रमेश म्हणतात जगभरातील देशांशी संवाद साधण्यासाठी खासदारांच्या टीम पाठवण्याची गरज नव्हती. हा मुळ मुद्यांवरून लक्ष्य भरकटवण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधीना पाकिस्तानने भारताची किती विमाने पाडली, त्याचा तपशील हवा आहे.
काँग्रेसच्या या मानसिकतेत सातत्य आहे. भारताने २०१६ मध्ये सर्जिकल स्ट्राईक केला होता तेव्हा, असे काही घडलेच नाही असा पवित्रा पक्षाने आधी घेतला. पुरावे मागितले. बालाकोटचा हवाई हल्ला झाला तेव्हा चार दोन झाडे पडली असतील असा दावा केला. आणि आता त्यांना ऑपरेशन सिंदूर किरकोळ वाटते आहे.
जगाच्या पाठीवर एक असा देश आहे जो हरलेली लढाई जिंकल्याचा दावा करून जगभरात विजयी मिरवणुका काढतो आहे. त्यांचा लष्कर प्रमुख जो पाकिस्तानचा खरा सत्ताधारी आहे तो स्वत:ची फिल्ड मार्शल पदी बढती करून घेतोय. जसे
कधी काळी नेहरुंनी स्वत:ला भारतरत्न प्रदान केले होते. आणि दुसऱ्या बाजूला एक कर्मदरिद्री नेत्यांचा देशद्रोही पक्ष असा आहे, जो आपल्या लष्कराच्या चमकदार विजयाला मामुली घटना म्हणतो आहे. खरगे ऑपरेशन सिंदूर फसले किंवा अपयशी झाले असेही म्हणतील परंतु काही काळानंतर. आज ते तसे म्हणाले तर या वयात त्यांना जोड्याने मार खावा लागेल.
काँग्रेस नेते मनातल्या गोष्टी अजिबात न लपवता अगदी स्पष्टपणे बोलून मोकळे होतात ही एक चांगली बाब आहे. काँग्रेस ही मुस्लीम लीग बनली आहे, हे लोकांच्या चटकन लक्षात येते. हा एक असा पक्ष आहे, जो सतत भारताला पोखरण्याचे काम करतो. राष्ट्रभक्तांची बदनामी करणे, त्यांचे मानसिक खच्चीकरण करणे, देशद्रोह्यांची तळी उचलणे, पाकिस्तानच्या गळ्यात गळे घालणे, देशातील पाकिस्तानवादी शक्तींना बळ देणे हे सगळे प्रकार या पक्षाला वर्ज्य नाहीत. या मानसिकतेमुळे काँग्रेस पक्ष सातत्याने गाळात जातो आहे. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे. या देशात जेव्हा आरपारची लढाई होईल ती साडे
तीन आघाड्यांवर होईल. चीन, पाकिस्तान, बांगलादेश आणि देशातील पंचम स्तंभीय. पाकिस्तानचे नेतृत्व मार खाल्लेला फिल्ड मार्शल मौलाना आसिफ मुनीर करतोय. देशातील पंचम स्तंभीयांशी लढाई सुरू आहे, त्याचे नेतृत्व काँग्रेसचे पडेल फिल्ड मार्शल मल्लिकार्जुन खरगे, दुसरे फिल्ड मार्शल राहुल गांधी करतायत.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
