30 C
Mumbai
Wednesday, May 24, 2023
घरसंपादकीयमोदींच्या पाया पडले पवारांना मागे हटवले...

मोदींच्या पाया पडले पवारांना मागे हटवले…

राऊतांना पापुआ न्यू गिनीतला जादूटोणा दिसला. ज्यांना आपल्या पक्षप्रमुखांच्या खालची मुख्यमंत्र्यांची खुर्ची कशी गेली याचा पत्ता लागला नाही

Google News Follow

Related

पापूआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मापारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाया पडले. शिउबाठाचे नेते संजय राऊत मात्र याचे कौतूक नाही. एका छोट्याशा जादूटोणेवाल्या देशाचा पंतप्रधान मोदींच्या पाया पडला त्यात काय विशेष? क्वाड देशांच्या बैठकीत जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, यांना मोदींची स्वाक्षरी घेण्याची इच्छा झाली, त्याचेही राऊतांना कौतुक असण्याचे कारण नाही. मोदींच्या नजरेला पापुआ न्यू गिनीचे लष्करी महत्व दिसते, तिथली खनिज श्रीमंती दिसते, देशाचा फायदा दिसतो. राऊतांना तिथला जादूटोणा दिसतो. हा ज्याच्या त्याच्या दृष्टीकोनातील फरक आहे.

जपानमध्ये नुकतीच क्वाड देशाची बैठक पार पडली. या बैठकीत ऑस्ट्रेलिया, जपान, भारत आणि अमेरीकेचे सर्वोच्च नेते सहभागी झाले होते. याच बैठकीत जो बायडन यांनी मोदींच्या लोकप्रियतेची भरभरून प्रशंसा केली. मोदी पुढील महिन्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. ‘या दौऱ्याच्या वेळी अनेकांना तुम्हाला भेटायचे आहे, मला सतत फोन येतायत. तुमची लोकप्रियता इतकी आहे, की मलाही तुमची स्वाक्षरी घेण्याची इच्छा होते आहे’, असे बायडन या बैठकीत मोदींना म्हणाले. अमेरीकाही महासत्ता आहे, तो छोटासाही देश नाही आणि जादूटोणेवाला देशही नाही.

कधी काळी श्रीलंकेसारखा छोटासा शेजारी देश भारतालाची किंमत करत होता. भारताचे पंतप्रधान राजीव गांधी जेव्हा इथे दौऱ्यावर गेले होते, तेव्हा मानवंदना देताना श्रीलंकेच्या नौदल सैनिकाने भारतीय पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पाठीत बंदुकीचा दस्ता हाणला होता. १९८७ ची ही घटना. आज अमेरिकेसारख्या महासत्तेचा प्रमुख भारताच्या पंतप्रधानांच्या लोकप्रियतेला वाकून नमस्कार करतो आहे.

क्वाड बैठकीनंतर मोदी पापुआ न्यूगिनी मध्ये गेले. तिथे पुन्हा एकदा पंतप्रधान जेम्स मापारे यांनी मोदींनी पायाला हात लावून नमस्कार केला. मोदींना जो आदर मिळतो आहे, त्यातून फक्त त्यांची लोकप्रियता आणि त्यांच्याबद्दल लोकांना वाटणारा आदर स्पष्ट होत नसून भारतातील विरोधी पक्ष किती कोते आणि वाह्यात आहेत ही बाबही लोकांच्या समोर येते आहे.

‘पापुआ न्यू गिनी हा जेमतेम ६० लाख लोकसंख्या असलेला आदिवासी देश. या देशात जंतर मंतर आणि जादूटोणा चालतो. तिथल्या पंतप्रधानांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.’ अशी मुक्ता फळे राऊतांनी उधळली. मूळात राऊतांचा भूगोल प्रचंड कच्चा आहे. ज्यांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थान नेमकं कुठे आहे, याबाबत धड माहिती नाही, त्यांनी जगातील एका स्वतंत्र देशाबद्दल असे अकलेचे तारे तोडण्याचे कारण नाही. त्यांच्या माहितीसाठी पापुआ न्यूगिनीची लोकसंख्या सुमारे ९५ लाखाच्या घरात आहे. पत्रकार असलेल्या राजकीय नेत्याने किमान आकडेवारी तरी अचूक सांगावी अशी जनतेची अपेक्षा असते. परंतु राऊतांचा भर अलिकडे माहिती देण्यापेक्षा थापा मारण्यावर जास्त दिसतो.

देशाचे महत्व लोकसंख्येच्या आधारावर ठरले असते तर भारताला भूतान आणि श्रीलंकेला जपण्याचे काय कारण होते. परंतु गोष्टी शिउबाठा या पक्षातील नेत्यांच्या कुवती पलिकडच्या आहेत. याच जेम्स मापारे यांना गेल्या वर्षी चीनचे राष्ट्राध्यक्षशी जिनपिंग गेल्या वर्षी भेटले होते. त्यांना चीनमध्ये येण्याचे निमंत्रणही दिले होते. ऑस्ट्रेलियाच्या अगदी जवळ असलेला हा देश प्रशांत महासागरातील अत्यंत महत्वाचा देश. सोने आणि तांबे अशा खनिजांनी संपन्न. चीनने बेल्ट एण्ड रोड या योजनेअंतर्गत इथे प्रचंड गुंतवणुकही केली आहे.

ऑस्ट्रेलियाला प्रशांत महासागरात घेरण्यासाठी चीनचा राष्ट्राध्यक्ष या देशाला सतत गुळ लावत असतो. चीनच्या या देशातील गुंतवणुकीमुळे ऑस्ट्रेलियाच्या पोटात गोळा आला आहे. इतके या देशाचे प्रशांत महासागर पटट्यात लष्करी महत्व आहे.   परंतु राऊतांना इथला जादूटोणा दिसला. ज्यांना आपल्या पक्षप्रमुखांच्या खालची मुख्यमंत्र्यांची खुर्ची कशी गेली याचा पत्ता लागला नाही त्यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणाबद्दल बडबड कशाला करावी. त्यांनी ‘पुतीन, बायडन यांनी फोन करून विचारले की हे उद्धव ठाकरे कोण?’ अशा फाकांड्या मारत फिरावं किंवा ‘तुम्ही जागतिक आरोग्य संघटनेला सुद्धा कोविडच्या काळात सल्ला दिला’, असे प्रश्न विचारून लोकांचा टाईमपास करावा.

एका बाजूला जगाने पाहिले की, बायडन आणि मापारे पंतप्रधान मोदींबद्दल आदर व्यक्त करतायत. कर्नाटकच्या शपथविधी सोहळ्यातील एक व्हीडिओ याच दरम्यान व्हायरल झाला. कर्नाटकमध्ये नव्याने सत्तारुढ झालेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या शपथविधी सोहळ्यात सर्व पक्षीय नेते हात उंचावतायत. महाविकास आघाडीचे मार्गदर्शक आणि राऊतांचे दिशादर्शक शरद पवार यांना मात्र या नेत्यांनी मागे ढकलले आहे.

हे ही वाचा:

भुयारी मार्गात तुंबलेल्या पाण्यात गाडी अडकली; इन्फोसिसच्या इंजीनियरचा मृत्यू

दिल्लीमध्ये आणखी दोन दिवस उष्म्याचा कहर, तापमान अर्धशतकाकडे!

पोलिसाच्या प्रसंगावधानामुळे तरुणीचा वाचला जीव

ठाकरेंच्या पक्षाच्या वाट्याला मविआमध्ये आता छोट्या भावाची भूमिका

हा व्हीडीयो पाहून अनेकांना रिकी पाँटिंगच्या जुन्या व्हीडिओची आठवण झाली. ऑस्ट्रेलियाची टीम मुंबईतील सामना जिंकल्याचे सेलिब्रेशन करत होती. बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष शरद पवार यांची लुडबुड दूर करण्यासाठी त्यांना हाताला धरून बाजूला करण्यात आले. अर्थात या दोन्ही घटनांमुळे पवारांचे महत्व कमी होत नाही. पवार हे राऊतांना गुरूस्थानी आहेत. पवारांना बसण्यासाठी खुर्ची उचलताना त्यांना लोकांनी पाहिले आहे. याबाबत त्यांनी स्वत:च खुलासा केला होता. पवार ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्यासाठी खुर्ची उचलली तर बिघडलं काय? असा सवाल त्यांनी केला होता. आदरापोटी त्यांनी पवारांसाठी खुर्ची जरूर उचलावी. फक्त असा आदर दुसरा एखादा नेता मोदींना देतो, तेव्हा आदरापोटी उचलेल्या खुर्चीची आठवण ठेवावी.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,851चाहतेआवड दर्शवा
2,023अनुयायीअनुकरण करा
73,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा