28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरविशेषदिल्लीमध्ये आणखी दोन दिवस उष्म्याचा कहर, तापमान अर्धशतकाकडे!

दिल्लीमध्ये आणखी दोन दिवस उष्म्याचा कहर, तापमान अर्धशतकाकडे!

रविवारी दिल्लीतील नजफगडमध्ये सर्वाधिक ४६.३ तापमान नोंदवले

Google News Follow

Related

दिल्लीतील नागरिक भयंकर उष्म्याने घामाघूम झाले आहेत. दिल्ली आणि आसपासच्या परिसरात तापमानात अचानक वाढ झाली आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस अशाच उष्म्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच, वेगवान आणि गरम वारे वाहतील, असेही म्हटले आहे.

नवी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात तापमानात ४० अंश सेल्सिअसच्या वर तापमानाची नोंद झाली आहे. उष्म्यामुळे लोकांचे हाल होत आहेत. रविवारी दिल्लीतील नजफगडमध्ये सर्वाधिक ४६.३ तापमान नोंदवले गेले. तर, नरेला आणि पीतमपुरा येथे ४५ अंश तापमानाची नोंद झाली. आयानगरमध्ये ४४ तर, पालममध्ये ४३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली-एनसीआर च्या विविध ठिकाणी ४२ ते ४५.५ अंश सेल्सिअसदरम्यान तापमान होते. तर, सफदरजंगमध्ये सर्वाधिक ४२.९ अंश तापमानाची नोंद झाली. संपूर्ण दिल्लीत कमाल ४२.० तर किमान २४ अंश तापमानाची नोंद झाली. तर, २१ ते २५ दरम्यान नवी दिल्लीत कमाल तापमान ४०.२ तर किमान २६.७ अंश राहण्याची शक्यता आहे. २६ ते ३० मे दरम्यान कमाल ४०.४ तर किमान २६.६ अंश राहण्याची शक्यता आहे. या भीषण उष्म्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

कारगिल हुतात्मा वडिलांसाठी त्याने मॅनेजमेंटचा मार्ग सोडला, स्वीकारली लष्करी अकादमी

ने मजसी ने, जयोस्तुते या कविता अभ्यासक्रमात समाविष्ट व्हाव्यात!

छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये चकमकीत चार नक्षलवादी जखमी

फुटबॉल स्टेडियममध्ये चेंगराचेंगरीमुळे गेला १२ जणांचा जीव

दोन दिवस कसोटीचे

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २२ आणि २३ मे रोजी नवी दिल्लीवासींना प्रचंड उष्म्याशी सामना करावा लागेल. या दरम्यान तापमान किमान २६ तर कमाल ४३पर्यंत पोहोचू शकते. २३ मे रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यताही आहे. २४ ते २६ दरम्यान पुन्हा दिल्लीत पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमान किंचित घसरून नागरिकांना दिलासा मिळेल. त्यावेळी कमाल तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकते.

यूपी, हरयाणातही ४० चा पारा

दिल्लीच्या जवळील यूपी आणि हरयाणा राज्यांतही उष्म्याने कहर केला आहे. कडक उन्हामुळे येतील तापमान ४१ ते ४२पर्यंत पोहोचते आहे. २३ आणि २४ मे रोजी ढगाळ वातावरणही असेल. परंतु त्यामुळे तापमानात फरक पडेल का, हे मात्र हवामान विभागाने कळवलेले नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा