31 C
Mumbai
Monday, May 22, 2023
घरक्राईमनामाते हेरॉइन नव्हते होती फक्त पावडर! पण भोगली २० वर्षे शिक्षा

ते हेरॉइन नव्हते होती फक्त पावडर! पण भोगली २० वर्षे शिक्षा

समोर आली अजब कहाणी, पण आता झाली सुटका

Google News Follow

Related

२० वर्षांपूर्वी म्हणजेच १४ मार्च २००३मध्ये अब्दुल्ला अयुब याच्याकडून १ कोटी किमतीचे २५ ग्रॅम हेरॉइन पोलिसांनी जप्त केले. त्यामुळे तो २० वर्षे तुरुंगात होता. मात्र त्याच्याकडून सापडलेली ते हेरॉइन ही निव्वळ एक २० रुपयांची साधी पावडर असल्याचे निदर्शनास आले आणि त्याची अखेर सुटका झाली.

अयुबच्या बाबतीत घडलेली ही घटना म्हणजे एखाद्या चित्रपटातील रंजक कथाच वाटेल. त्याच्या खोलीत राहणाऱ्या भाडेकरूने सूड घेण्याच्या उद्देशाने त्याला अडकवले आणि २० वर्षे तो ती शिक्षा भोगत राहिला.

अयुबचे वकील प्रेमप्रकाश श्रीवास्तव यांनी सांगितले की, पुरानी बस्ती येथील पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडून हेरॉइन जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्याआधी काही आठवडे अयुबने भाड्याने दिलेल्या खोलीतून खुर्शीद नावाच्या पोलिस कर्मचाऱ्याला बाहेर काढले होते. त्याने भाड्याचे पैसे दिले नाहीत म्हणून अयुबने हे पाऊल उचलले. त्याचा राग येऊन खुर्शीदने पोलिस अधिकारी अनिल सिंग, लालजी यादव, नर्मदेश्वर शुक्ला यांच्या मदतीने एक कट रचला. या सगळ्यांनी अयुबकडे हेरॉइन सापडल्याचा बनाव रचला. शिवाय, हा कट यशस्वी होण्यासाठी सगळ्या पुराव्यांशीही छेडछाड केली.

हे ही वाचा:

कारगिल हुतात्मा वडिलांसाठी त्याने मॅनेजमेंटचा मार्ग सोडला, स्वीकारली लष्करी अकादमी

दिल्लीमध्ये आणखी दोन दिवस उष्म्याचा कहर, तापमान अर्धशतकाकडे!

भुयारी मार्गात तुंबलेल्या पाण्यात गाडी अडकली; इन्फोसिसच्या इंजीनियरचा मृत्यू

फुटबॉल स्टेडियममध्ये चेंगराचेंगरीमुळे गेला १२ जणांचा जीव

जेव्हा गुन्हा दाखल झाला आणि अयुबला न्यायालयासमोर हजर करण्यात आले तेव्हा बस्ती पोलिस ठाण्याने हे हेरॉइन असल्याचे स्पष्ट केले. जेव्हा न्यायालयाने हे हेरॉइन लखनऊ येथील प्रयोगशाळेत धाडले तेव्हा ते हेरॉइन नसल्याचे उघड झाले. मग याची तपासणी दिल्लीतील प्रयोगशाळेत करण्यात आली. लखनऊमधून तज्ज्ञांना बोलावणे धाडण्यात आले आणि त्यांनी हे हेरॉइन नसल्याचा निर्वाळा दिला. हेरॉइनचा रंग बदलत नाही. पण ही पावडर तपकिरी रंगाची दिसत होती. त्यानंतर न्यायाधीशांनी अयुब याची सुटका करण्याचे निर्देश दिले.

अवघ्या २० रुपयांच्या साध्या पावडरसाठी अयुबला २० वर्षांचा कारावास भोगावा लागला.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,853चाहतेआवड दर्शवा
2,026अनुयायीअनुकरण करा
73,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा