22 C
Mumbai
Tuesday, December 16, 2025
घरदेश दुनिया२६/११ चा दहशतवादी तहव्वुर राणाला भारतात आणणार

२६/११ चा दहशतवादी तहव्वुर राणाला भारतात आणणार

अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Google News Follow

Related

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाकडून भारताला मोठा दिलासा मिळाला आहे. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वुर राणाला शनिवारी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी दिली आहे. २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणात राणाचा ताबा हवा असल्याने पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक राणाचे प्रत्यार्पण करण्याची भारताची बऱ्याच काळापासून मागणी होती. अखेर याला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणा याच्या भारताकडे प्रत्यार्पण करण्यास अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. ६३ वर्षीय राणाला लॉस एंजेलिस तुरुंगात ठेवण्यात आले आहे. एफबीआयने राणाला २००९ मध्ये शिकागो येथे अटक केली होती. तो पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीशी संबंधित आहे, ज्याला दाऊद गिलानी म्हणूनही ओळखले जाते. राणा हा या हल्ल्यातील एक प्रमुख व्यक्ती आहे असून दहशतवाद्याला पाठिंबा देण्यासाठी त्याला आणि इतरांना पाकिस्तानमध्ये मदत केल्याचा आरोप आहे. लष्कर-ए-तैयबा (एलईटी) या गटाने हा हल्ला केला. हेडली या हल्ल्यातील सहभागासाठी अमेरिकेत ३५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे.

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात त्याच्या प्रत्यार्पणाला आव्हान दिल्यानंतर तहव्वूर राणाचे अपील फेटाळण्यात आले असून, त्याच्या भारताकडे प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. कनिष्ठ न्यायालये आणि अनेक संघीय न्यायालयांमध्ये कायदेशीर लढाई हरल्यानंतर राणाने शेवटचा सॅन फ्रान्सिस्कोमधील यूएस कोर्ट ऑफ अपील फॉर द नॉर्थ सर्किटमध्ये धाव घेतली होती.

दरम्यान, मुंबई पोलिसांच्या आरोपपत्रानुसार राणा दहशतवाद्यांना हल्ल्याचे ठिकाण आणि भारतात आल्यानंतर राहण्याची ठिकाणे सांगून मदत करत होता. राणानेच ब्लू प्रिंट तयार केली होती, ज्याच्या आधारे दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. राणा आणि हेडलीवर दहशतवादी कट रचल्याचा आरोप होता.

प्रत्यार्पणाच्या निर्णयाविरुद्ध राणाने केलेले अपील अमेरिकन कोर्टाने १५ ऑगस्ट रोजी फेटाळले होते. तसेच दोन्ही देशांमधील प्रत्यार्पण करारानुसार त्याला भारतात पाठवले जाऊ शकते, असे अमेरिकन न्यायालयाने या निर्णयात स्पष्ट केले होते. भारताच्या ताब्यात दिले जाऊ नये म्हणून तहव्वूर राणाने अमेरिकेच्या न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली म्हणजेच बेकायदेशीर कोठडीत ठेवल्यावर दाखल केल्या जाणाऱ्या याचिकेचा आधार घेत न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, लॉस एंजेलिसच्या जिल्हा न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले होते की, भारताने तहव्वूरच्या प्रत्यार्पणाची मागणी ज्या आरोपांच्या आधारे केली आहे, त्या आरोपांचा विचार करून त्याच्या प्रत्यार्पणाला परवानगी दिली जाऊ शकते.

कोण आहे तहव्वूर राणा?

तहव्वूर राणाचा जन्म आणि शिक्षण पाकिस्तानात झाले. त्यानंतर थोड्या काळासाठी पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर म्हणून सेवा केली. १९९७ मध्ये तो कॅनडाला गेला. तिथे इमिग्रेशन सेवांमध्ये विशेषज्ञ म्हणून कार्यरत झाला आणि अखेरीस त्याने कॅनडाचे नागरिकत्व मिळवले. २००९ साली डॅनिश वृत्तपत्राने प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दलचे एक चित्र छापल्यानंतर वृत्तपत्राचे कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची योजना राणाने आखली होती. याप्रकरणात शिकागोच्या न्यायालयाने त्याला दोषी ठरविले होते.

हे ही वाचा : 

हमासच्या कैदेत असलेल्या चार महिला सैनिकांची सुटका होणार!

अजमेर दर्ग्यात शिवमंदिर असल्याचा दावा करणाऱ्या विष्णू गुप्ता यांच्या गाडीवर गोळीबार

राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न येताचं भारत योग्य पावले उचलेल!

मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश, भोंगे उतरविण्याची जबाबदारी पोलिसांचीच!

अटकेनंतर तहव्वूर राणाने कबूल केले की, लष्कर-ए-तैयबा (एलईटी) ही एक दहशतवादी संघटना आहे आणि त्याचा बालपणीचा मित्र डेव्हिड हेडली पाकिस्तानमधील त्यांच्या प्रशिक्षण शिबिरात गेला होता. अमेरिकन कागदपत्रानुसार, २००५ च्या उत्तरार्धात हेडलीला एलईटीकडून भारतात प्रवास करून तिथे पाळत ठेवण्याच्या सूचना मिळाल्या होत्या. तर, मार्च २०१६ मध्ये मुंबईतील विशेष न्यायालयासमोर उलटतपासणीदरम्यान, हेडलीने न्यायालयाला सांगितले की, पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्सचे (आयएसआय) मेजर इक्बाल यांच्या सूचनेनुसार हल्ल्यासाठी लोकांची भरती करण्यासाठी म्हणून त्याने भाभा अणु संशोधन केंद्राला भेट दिली होती. राणाला याची माहिती होती. ताजमहाल पॅलेस हॉटेलवरील हल्ल्याच्या तपशिलांचीही राणाला माहिती होती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा