भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, एस जयशंकर यांच्या लंडन भेटीत काही खलिस्तान्यांनी निषेध व्यक्त केला. व्यत्यय आणण्याच्या प्रयत्नात खलिस्तान्यांनी हातात तिरंगा घेत एस जयशंकर यांच्या गाडीकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी खलिस्तान्यांना रोखून बाजूला नेले.
एस जयशंकर हे चर्चेनंतर चॅथम हाऊसच्या ठिकाणाहून बाहेर पडत असताना या परिसरात खलिस्तान्यांनी गर्दी केली होती. हातात तिरंगा घेऊन त्यांची घोषणाबाजी सुरू होती. एस जयशंकर हे त्यांच्या गाडीकडे येताच यातील एका खलिस्तान्याने त्यांच्या गाडीकडे धाव घेतली आणि भारतीय राष्ट्रध्वज फाडला. यानंतर तातडीने उपस्थित पोलिसांनी या व्यक्तीला बाजूला केले. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या ऑनलाइन व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो माणूस आक्रमकपणे मंत्र्यांच्या ताफ्याकडे धावत असल्याचे दिसून आले आहे. इतरांकडून घोषणाबाजी केली जात असून तिरंगाही हातात दिसत आहे.
हे ही वाचा:
‘अकबर’ बलात्कारी होता तर ‘औरंगजेब’ने असंख्य हिंदूंची हत्या केली!
सावरकर बदनामी प्रकरणी न्यायालयात गैरहजर राहणाऱ्या राहुल गांधींना दंड!
केंब्रिज विद्यापीठात दोनदा नापास होणाऱ्या राजीव गांधींची पंतप्रधान पदी निवड आश्चर्यकारक!
भारतीय शेअर बाजाराचे दमदार पुनरागमन
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या ४ ते ९ मार्च या कालावधीत ब्रिटनच्या अधिकृत दौऱ्यादरम्यान ही घटना घडली. तत्पूर्वी, जयशंकर यांनी चेव्हनिंग हाऊस येथे ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांच्यासोबत व्यापक चर्चा केली, ज्यामध्ये धोरणात्मक समन्वय, राजकीय सहकार्य, व्यापार वाटाघाटी, शिक्षण, तंत्रज्ञान, गतिशीलता आणि लोक-ते-लोक देवाणघेवाण यासह विविध द्विपक्षीय मुद्द्यांचा समावेश होता.