अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवादी संघटना हमासला पुन्हा एकदा ओलिसांच्या सुटकेच्या मुद्द्यावरून कठोर इशारा दिला आहे. त्यांनी हमासला अंतिम अल्टिमेटम देत सर्व जिवंत ओलिसांची सुटका करा आणि त्यांनी हत्या केलेल्या लोकांच्या मृतदेहांना सुपूर्द करण्याची मागणी केली आहे.
ट्रम्प यांनी हमासच्या दहशतवाद्यांना तात्काळ ओलिसांना परत करण्याचा इशारा दिला आहे अन्यथा तुमचा मृत्यू निश्चित आहे, असा इशाराचं त्यांनी दिला आहे. ओलिसांना ताबडतोब सोडावे अन्यथा नरकाची दारे उघडली जातील, असा इशारा त्यांनी पुन्हा एकदा हमासला दिला आहे. सर्व ओलिसांना आत्ताच सोडा, नंतर नाही, आणि तुम्ही ज्या लोकांची हत्या केली आहे त्यांचे सर्व मृतदेह ताबडतोब परत करा, अन्यथा तुमच्यासाठी सर्व काही संपले आहे. फक्त आजारी आणि विकृत लोकंच मृतदेह ठेवतात. तुम्ही आजारी आणि विकृत आहात, असे त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.
“जर तुम्ही माझ्या म्हणण्याप्रमाणे केले नाही तर हमासचा एकही सदस्य सुरक्षित राहणार नाही. मी नुकताच माजी ओलिसांना भेटलो आहे ज्यांचे जीवन तुम्ही उध्वस्त केले आहे. हा तुमचा शेवटचा इशारा आहे! आता गाझा सोडण्याची वेळ आली आहे, जोपर्यंत तुमच्याकडे अजूनही संधी आहे. तसेच, गाझाच्या लोकांसाठी एक सुंदर भविष्य वाट पाहत आहे, परंतु जर तुम्ही ओलिस ठेवले तर नाही. जर तुम्ही तसे केले तर तुमचा अंत निश्चित आहे. एक योग्य निर्णय घ्या. ओलिसांना आत्ताच सोडा, नाहीतर नंतर भरपाई द्यावी लागेल,” अशा कठोर शब्दात ट्रम्प यांनी इशारा दिला आहे. परराष्ट्र खात्यात ओलिस प्रकरणांसाठी विशेष राष्ट्रपती दूत म्हणून नामांकित अॅडम बोहेलर यांनी दोहा येथे हमासच्या प्रतिनिधींची भेट घेतल्यानंतर हा संदेश आला आहे.
हे ही वाचा:
खलिस्तान्यांकडून जयशंकर यांच्या ताफ्यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न
‘अकबर’ बलात्कारी होता तर ‘औरंगजेब’ने असंख्य हिंदूंची हत्या केली!
सावरकर बदनामी प्रकरणी न्यायालयात गैरहजर राहणाऱ्या राहुल गांधींना दंड!
केंब्रिज विद्यापीठात दोनदा नापास होणाऱ्या राजीव गांधींची पंतप्रधान पदी निवड आश्चर्यकारक!
यापूर्वीही ट्रम्प यांनी हमासला बंधकांना सोडण्याच्या मुद्द्यावरून इशारा दिला होता. ओलिसांची सुटका न झाल्यास नरकाची दारे उघडू असा इशारा काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी हमासला दिला होता. यासोबतच त्यांनी जॉर्डन आणि इजिप्तलाही इशारा दिला होता. गाझामधून पॅलेस्टिनी निर्वासितांना घेण्यास नकार दिला तर ते जॉर्डन आणि इजिप्तला करत असलेली मदत रोखू शकतात. यानंतर हमासने नरमाईची भूमिका घेत काही ओलिसांची सुटका केली होती.