27 C
Mumbai
Saturday, June 25, 2022
घरक्राईमनामागुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा

Related

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशावरून पोलिसांनी सुंदर पिचाई यांच्याविरोधात कॉपी राईटच्या (Copy Right Act) कलमाखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे. सुंदर पिचाई यांच्यासह सहा जणांवर एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

जानवर, बरसात, हां मैंने भी प्यार किया है, एक रिश्ता, अंदाज, शकालाका बूम बूम यासारख्या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी सुंदर पिचाई यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या ‘एक हसीना थी एक दिवाना था’ या चित्रपटाचे कॉपीराईट कोणालाही दिलेले नाहीत. असे असूनही या चित्रपटाची गाणी आणि व्हिडिओ अनेकांनी गुगल आणि यूट्यूबवर अपलोड केले आहेत. याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२०१७ सालचा ‘एक हसीना थी, एक दिवाना था’ हा चित्रपट विनापरवानगी युट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे. कॉपीराईट पूर्णपणे माझ्याकडे असून या चित्रपटाचे हक्क विकलेले नाहीत, असे सुनील यांनी सांगितले. मात्र, असे असतानाही हा चित्रपट अपलोड करण्यात आला. या चित्रपटाला मिळणाऱ्या हिट्सचा फायदा दुसऱ्याच व्यक्ती आणि यूट्यूबला होत आहे. एक निर्माता म्हणून मला त्यातून एक पैसाही मिळत नाही. अशा परिस्थितीत मी गेल्या अनेक महिन्यांपासून यूट्यूब आणि गुगलच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्याचे प्रयत्न करत होतो.

हे ही वाचा:

राजपथावर संचलन पाहायला होते ‘हे’ खास पाहुणे

भारतीय महिला हॉकी संघाला उघडले वर्ल्डकपचे दरवाजे

युवराजच्या घरी आला आणखी एक ‘युवराज’

श्रीनगरच्या लालचौकात प्रथमच फडकला भारतीय तिरंगा

या प्रकरणी पोलिसांमार्फत थेट तक्रार दाखल करण्यात यश न आल्याने सेशन्स कोर्टाचा सहारा घेतल्याचे सुनील यांनी सांगितले. त्यानुसार कोर्टाने पोलिसांना कॉपीराईटच्या विविध कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात सुंदर पिचाई यांच्यासह गुगल आणि यूट्यूबशी संबंधित आणखी पाच अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामध्ये गौतम आनंद, पवन अग्रवाल, चैतन्य प्रभू, जो गियर आणि नम्रता राजकुमार यांचा समावेश आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,938चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
10,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा