इस्रायलमधील भारताचे राजदूत जे पी सिंह यांनी दहशतवादाविरुद्ध आंतरराष्ट्रीय युती उभी करण्याचे आवाहन केले. तसेच पाकिस्तानने दहशतवादी हाफिज सईद, साजिद मीर आणि झाकीउर रहमान लखवी यांना भारताच्या स्वाधीन करावे अशी मागणी केली. शिवाय भारताचे पाकिस्तानविरुद्धचे ‘ऑपरेशन सिंदूर’ स्थगित आहे थांबलेले नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
इस्रायली टीव्ही चॅनल आय२४ ला दिलेल्या मुलाखतीत सिंग म्हणाले की, “आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत, इस्रायल आणि दहशतवादाचा सामना करणाऱ्या इतर अनेक देशांसह, आपल्याला आपला राजनैतिक विस्तार वाढवायचा आहे, आपल्याला सहकार्य करायचे आहे, दहशतवादाविरुद्ध आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दहशतवादी गटांच्या समर्थकांविरुद्ध युती करायची आहे,” असा प्रस्ताव त्यांनी मांडला.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना, सिंग यांनी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांना दोष दिला आणि इस्लामाबादवर हाफिज सईद, साजिद मीर आणि झाकीउर रहमान लखवी सारख्या बड्या दहशतवाद्यांना संरक्षण देण्याचा आरोप केला. भारतीय राजदूत पुढे म्हणाले की, ज्याप्रमाणे अमेरिकेने २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर हुसेन राणाला भारताच्या स्वाधीन केले, त्याचप्रमाणे पाकिस्ताननेही तसे करावे. अमेरिका दहशतवाद्याला भारताच्या ताब्यात देऊ शकते, तर पाकिस्तान का देऊ शकत नाही? हाफिज सईद, लखवी, साजिद मीर यांना भारताच्या ताब्यात द्यावे आणि गोष्टी संपतील.
हे ही वाचा:
मशीद समितीला दणका! संभलमधील जामा मशिदीच्या सर्वेक्षणाचा मार्ग मोकळा
‘ऑपरेशन सिंदूर’ वर वादग्रस्त टिप्पणी; अशोका युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक अली खानला अटक
महिलांना आकर्षित करण्यासाठी ‘तो’ बनला हवाई दलाचा बनावट अधिकारी!
बोरिवलीत दोन कुटूंबात तुफान हाणामारी, ३ ठार!
जे पी सिंह म्हणाले की, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरुद्ध भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’ हे सध्या स्थगित आहे संपलेले नाही. दहशतवादाविरुद्धची लढाई सुरूच राहील. एक नवीन नियम स्थापित केला आहे, तो म्हणजे आक्रमक रणनीती अवलंबवण्याचा. दहशतवादी कुठेही असतील, त्या दहशतवाद्यांना मारावे लागेल आणि त्यांची पायाभूत सुविधा नष्ट करावी लागेल. भारताची कारवाई ही दहशतवादी गट आणि त्यांच्या पायाभूत सुविधांविरुद्ध होती, ज्याला पाकिस्तानने भारतीय लष्करी केंद्रांवर हल्ला करून प्रत्युत्तर दिले, असेही त्यांनी स्पष्ट केले.







