27 C
Mumbai
Sunday, June 15, 2025
घरराजकारणछगन भुजबळ मंत्री होणार, आज शपथविधी

छगन भुजबळ मंत्री होणार, आज शपथविधी

मंगळवारी घेणार शपथ

Google News Follow

Related

संतोष देशमुख हत्या प्रकरणात महायुतीचे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर अद्याप ते मंत्रिपद रिक्त होते. आता त्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना संधी देण्यात आली आहे.

भुजबळ मंगळवारी शपथ ग्रहण करणार आहेत, अशी माहिती राजभवनातून देण्यात आली आहे, असे कळते. मुंडे यांची हकालपट्टी झाल्यानंतर कुणाची वर्णी लागणार याची चर्चा होती. भुजबळ यांना या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे ते नाराज होते, पण अखेर त्यांची प्रतीक्षा संपली आहे.

हे ही वाचा:

त्रिकोणाचा चौथा कोन: राहुल गांधी

मालवणीत आईनेच करू दिला अडीच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

केएल राहुलचा दणदणीत धमाका!

“मयंक यादव – भारताचा वेगवान हिरा… पण दुखापतीनं झाकोळला!”

२० मे रोजी ते मंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मुंबईतील राजभवनात सकाळी १० वाजता छगन भुजबळ यांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या अन्न व नागरी पूरवठा खात्याची जबाबदारी आता छगन भुजबळ यांना दिली जाणार आहे.

छगन भुजबळ गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्रिपद न मिळाल्याने नाराज होते. याबाबतची खंत त्यांनी वारंवार बोलून दाखवली होती. अनेकदा शेरोशायरी करून टोमणेही मारले होते. इतकंच काय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. मात्र त्यांना काही मंत्रिमंडळात जागा मिळाली नव्हती. मात्र आता त्यांना मंत्रिपद मिळणार असल्याने भुजबळ समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

धनंजय मुंडे यांना बीडमधील सरपंच धनंजय देशमुख हत्या प्रकरणानंतर मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हा मुंडेकडे अन्न व नागरी पुरवठा हे खातं होतं.मात्र मुंडेच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपदावरुन वाद होऊ नये म्हणून पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ते खातं स्वत:कडे ठेवलं होतं. मात्र आता पु्न्हा एकदा भुजबळांना अन्न व नागरी पुरवठा या खात्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. भुजबळांकडे मविआ सरकारमध्येही याच खात्याची जबाबदारी होती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
251,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा