इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून जबरदस्त पदार्पण करणारा मयंक यादव याला भारताच्या वेगवान गोलंदाजीचे भविष्य मानले जात होते. मात्र सातत्याने होत असलेल्या दुखापतींमुळे त्याचा क्रिकेट कारकिर्द सध्या संकटात सापडलेला दिसत आहे.
२०२४ च्या हंगामात मयंकने पहिल्याच सामन्यात जबरदस्त वेग आणि अचूकतेच्या जोरावर लक्ष वेधले. त्याने १५६.७ किमी/तास वेगाने चेंडू टाकत चर्चेत झळकला. पहिल्या तीन सामन्यांमध्ये त्याने प्रभावी प्रदर्शन करताना ‘मॅन ऑफ द मॅच’चा किताबही पटकावला होता. मात्र चौथ्या सामन्याआधीच तो दुखापतीमुळे बाहेर गेला आणि संपूर्ण हंगामातून वगळण्यात आला.
२०२५ च्या हंगामातही मयंकला सुरुवातीचे सामने गमवावे लागले. दुखापतीतून सावरून परतल्यानंतर त्याने केवळ दोन सामने खेळले, पण पुन्हा एकदा दुखापतीने त्याला गाठले आणि तो पुन्हा हंगामातून बाहेर पडला. यंदा खेळलेल्या दोन्ही सामन्यांत तो प्रभावी ठरू शकला नाही.
मयंक यादवला एलएसजीने २०२३ मध्ये संघात घेतले होते. मात्र त्या वर्षीही तो एकही सामना खेळू शकला नव्हता. २०२४ मधील चमकदार कामगिरीनंतर त्याला भारताच्या टी-२० संघात संधी मिळाली. पण तीन सामन्यांनंतर पुन्हा दुखापत झाली आणि तो तेव्हापासून पुनरागमन करू शकलेला नाही.
जून २०२५ मध्ये मयंक केवळ २३ वर्षांचा होतोय. इतक्या कमी वयात वारंवार दुखापतींनी त्याच्या भविष्यास गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मयंककडे वेग, उंची, अचूकता आणि विविधता या सर्व गुणांचा संच आहे. मात्र त्याचे सततचे फिटनेस प्रश्न ही चिंतेची बाब बनली आहे. त्याने तज्ज्ञांच्या सल्ल्याने आपल्या दुखापतींच्या मूळ कारणांचा शोध घेणे गरजेचे आहे. त्याच्या अॅक्शनमुळे शरीरावर अतिरिक्त ताण येतो का, याचीही चिकित्सा व्हावी लागेल.
हेही वाचा :
‘ऑपरेशन सिंदूर’ वर वादग्रस्त टिप्पणी; अशोका युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक अली खानला अटक
खो खोचा श्वास थांबला!, अनिल गोखले यांचे निधन
तृणमूल काँग्रेसच्या युसूफ पठाणने सरकारच्या शिष्टमंडळाचे निमंत्रण नाकारले!
बांगलादेश: शेख हसीना यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला अटक!
मयंक यादव जर दीर्घ विश्रांती घेऊन संपूर्णपणे फिट होण्यावर भर देईल, तर त्याच्याकडून भारताला एक दर्जेदार वेगवान गोलंदाज मिळू शकतो. अन्यथा, भारत पुन्हा एकदा उमरान मलिक, वरुण आरोन किंवा मुनाफ पटेलप्रमाणे वेग असलेला पण टिकू न शकलेला गोलंदाज गमावू शकतो.
