उपनगरातील मालाड मालवणी येथे नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. १९ वर्षीय प्रियकराने ३० वर्षीय प्रेयसीच्या अडीच वर्षाच्या मुलीवर लैगिंक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना रविवारी उघडकिस आली आहे. हा सर्व प्रकार बळीत मुलीच्या आईसमोर घडला असून या कृत्यात आई देखील सामील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.याप्रकरणी मालवणी पोलिसांनी बलात्कार, हत्या,आणि पोक्सोचा गुन्हा दाखल केला असून आरोपीना अटक करण्यात आली आहे.
मालाड मालवणी येथे राहणारी ३० वर्षीय विवाहित महिलेने पतीला सोडचिठ्ठी दिली आहे, या महिलेला अडीच वर्षाची मुलगी असून मुलीसोबत ती मालवणी येथे वृद्ध आई सोबत राहण्यास आहे. विवाहित महिला ही घरकाम करून आई आणि अडीच वर्षाच्या मुलीचे पोषण करीत होती. त्याच परिसरात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणासोबत तिचे प्रेमप्रकरण सुरू होते.
पोलिसांना रुग्णालयाकडून माहिती मिळाली की, एका मुलीचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर पोलिस पथक तपासासाठी रुग्णालयात पोहोचले. डॉक्टरांनी सांगितले की अल्पवयीन मुलीचा मृत्यू श्वास गुदमरल्यामुळे झालेल्या धक्क्याने झाला आणि मुलीवर बलात्कार झाला आहे.
हे ही वाचा:
मशीद समितीला दणका! संभलमधील जामा मशिदीच्या सर्वेक्षणाचा मार्ग मोकळा
‘ऑपरेशन सिंदूर’ वर वादग्रस्त टिप्पणी; अशोका युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक अली खानला अटक
महिलांना आकर्षित करण्यासाठी ‘तो’ बनला हवाई दलाचा बनावट अधिकारी!
बोरिवलीत दोन कुटूंबात तुफान हाणामारी, ३ ठार!
या घटनेचा अधिक तपास केल्यानंतर पोलिसांनी मृत मुलीच्या आईला आणि तिच्या प्रियकराला कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमांखाली अटक केली आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ७०,६४,६५(२),६६,१०३,२३८,३(५) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ६,१०,२१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
