“२०१८ मध्ये व्हिसासाठी मी पाकिस्तान दूतावासात गेलो होतो. तेथील एका अधिकाऱ्याने माझी मुलाखत घेतली आणि मला दोन नवीन सिमकार्ड्स आणण्यास सांगितले. मी नूंह येथून सिमकार्ड्स विकत घेऊन दूतावासात दिले, त्यानंतर मला व्हिसा मिळाला. नंतर जेव्हा मी पाकिस्तानहून परत आलो, तेव्हा त्याने मला पुन्हा फोन केला आणि सांगितले की ज्या लोकांना व्हिसा हवा आहे, त्यांना तू पाठव. मी ८–१० लोकांना पाठवले आणि आम्ही पैसे वाटून घेतले… हरियाणाच्या नूंह जिल्ह्यातील कांगारका गावात राहणाऱ्या मोहम्मद तारिफ याला पाकिस्तानसाठी गुप्त माहिती देत असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आल्यानंतर त्याने हे धक्कादायक वास्तव उघड केले आहे.
तो आपल्या कबुलीत म्हणत आहे की, “२०२४ मध्ये त्याचा पुन्हा फोन आला आणि त्याने मला पाकिस्तान दूतावासात बोलावले. तिथे त्याने मला जाफर नावाच्या दुसऱ्या अधिकाऱ्याशी ओळख करून दिली. त्याने मला सांगितले की, ‘तुला आमच्यासाठी एक काम करायचं आहे आणि यासाठी लाखो रुपये मिळतील.’ त्याने मला सिरसा एअरबेसचे फोटो आणि व्हिडिओ पाठवण्यास सांगितले.”
मोहम्मद तारीफ तीनवेळा पाकिस्तानला जाऊन आलेला आहे. त्यानं सिरसा येथील हवाई दलाचे फोटो आणि व्हिडीओ पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांना पाठवले होते. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानने सिरसा हवाई तळाला लक्ष्य केलं. त्यासाठी पाकिस्तानकडून क्षेपणास्त्र डागण्यात आलं. पण ते शेतात कोसळलं. सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या चौकशीत तारीफनं धक्कादायक माहिती दिली आहे. भारतीय सैन्याशी संबंधित माहिती पाकिस्तानला दिल्याचा आणि पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याची कबुली त्यानं दिली आहे.
हे ही वाचा:
स्टार हाऊसिंग फायनान्स लि.ची झेप आता नॅशनल स्टॉक एक्स्चेंजकडे
“धुरंधर शमीची भेट बुलंद योगींशी – अफवांना क्लीन बोल्ड!”
महिलांना आकर्षित करण्यासाठी ‘तो’ बनला हवाई दलाचा बनावट अधिकारी!
गुप्तचर यंत्रणांनी पाकिस्तानच्या आणखी एका गुप्तहेर नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. दोन दिवसांत नूंहमध्ये गुप्तहेरगिरीच्या आरोपाखाली झालेली ही दुसरी अटक आहे. यापूर्वी राजाका गावात राहणाऱ्या अरमानला अटक करण्यात आली होती.
पोलिसांची कारवाई आणि आरोप
तावडू पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, पोलिसांनी पाकिस्तान दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांसह तिघांविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. आरोपीकडून एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू असून, न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
गोपनियम अधिनियम व देशद्रोहाचे कलम
नूंह पोलिसांनी आरोपी मोहम्मद तारिफ, पाकिस्तान उच्चायुक्तालयात नियुक्त असलेला पाकिस्तानी नागरिक आसिफ बलोच आणि जाफर यांच्यावर भारतीय दंड संहिता, १९२३ चा गोपनियम अधिनियम आणि देशद्रोहाशी संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत.
इतर अटकप्रकरणे
या प्रकरणाच्या काही दिवस आधी हिसार येथील व्लॉगर ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानच्या आयएसआयसाठी गुप्त माहिती पाठवल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. तिची पाकिस्तानमधील अधिकाऱ्यांशी सतत संपर्क होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
