32 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरदेश दुनियाश्रीजेशची भिंत आणि भारताला हॉकीचे ऐतिहासिक ब्राँझ

श्रीजेशची भिंत आणि भारताला हॉकीचे ऐतिहासिक ब्राँझ

Google News Follow

Related

भारतीय पुरुष हॉकी संघाने गुरुवारी इतिहास घडविला. जर्मनीला ५-४ असे पराभूत करत टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने ब्राँझपदकावर शिक्कामोर्तब केले आणि ४१ वर्षांनी ऑलिम्पिक पदक जिंकण्याचा पराक्रम केला. याआधी १९८०मध्ये भारताने अखेरचे पदक (सुवर्ण) ऑलिम्पिकमध्ये जिंकले होते. भारताचे हे टोकियो ऑलिम्पिकमधील चौथे पदक ठरले. आतापर्यंत मिराबाई चानूचे वेटलिफ्टिंगमधील रौप्य, सिंधूचे बॅडमिंटनमधील ब्राँझ, लव्हलिना बोर्गोहेनचे बॉक्सिंगमधील ब्राँझ आणि आता पुरुष हॉकी संघाचे ब्राँझ अशी चार पदके भारताच्या खात्यात जमा झाली आहेत. कुस्तीतही भारताला आणखी पदक मिळणार आहे, ते रविकुमार दहियाच्या रूपात. त्याने अंतिम फेरीत धडक मारली आहे.

जर्मनीविरुद्धच्या या सामन्यात ५-४ अशा स्थिती असताना अखेरच्या सहा सेकंदांत जर्मनीला पेनल्टी कॉर्नर मिळाला तेव्हा समस्त भारतीयांचा श्वास थांबला होता. पण आपल्या तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये खेळणारा गोलरक्षक श्रीजेश भिंतीसारखा उभा राहिला. त्याने जर्मनीचा गोल करण्याचा तो प्रयत्न गोलजाळ्याकडे जाणारा चेंडू डाव्या हाताने बाहेर फेकत हाणून पाडला आणि भारतीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. श्रीजेशवर तर खेळाडू, सपोर्ट स्टाफमधील सदस्यांच्या उड्या पडल्या. श्रीजेशने या संपूर्ण सामन्यात नऊ वेळा जर्मनीचे प्रयत्न हाणून पाडले. त्यामुळे आजच्या या यशात त्याचा सिंहाचा वाटा आहे हे मान्य करावे लागेल. भारतीय खेळाडूंनी अश्रुंना वाट मोकळी करून दिली. जर्मनीच्या खेळाडूंचाही स्वप्नभंग झाला.

भारताने याआधी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णकाळ पाहिला होता. आठ सुवर्णपदके जिंकणारा भारत १९८०पासून पदकांच्या दुष्काळाचा अनुभव घेत होता. पण यावेळी भारतीय हॉकीने कात टाकली. पुरुष आणि महिला दोन्ही संघांनी जबरदस्त कामगिरी करत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली.

हे ही वाचा:
आज ५ ऑगस्ट…मोदी सरकार साधणार वचनपूर्तीची हॅटट्रिक?

प्रतिस्पर्धी कुस्तीगीर रविकुमारच्या दंडाचा चावा घेत राहिला, पण…

उपाहारगृहे, हॉटेलात ४ नंतर कोरोनाची भीती?

मराठा आरक्षणाच्या बाबतीत ठोस निर्णय घेण्याची धमक ठाकरे सरकारमध्ये नाही

जर्मनीने पहिल्या क्वार्टरमध्ये ओरुझ तिमूरच्या जोरावर गोल करत आघाडी घेतली पण दुसरा क्वार्टर खूपच रोमांचक राहिला. यात दुसऱ्या मिनिटाला सिमरनजीतने मैदानी गोल करत भारताला बरोबरी साधून दिली. पण या क्वार्टरमध्ये जर्मनीच्या निकालस (२४वे मिनिट) आणि बेनेडिक्टने (२५वे मिनिट) मैदानी गोल करत जर्मनीला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली होती. त्यामुळे भारतीयांमध्ये कुठेतरी थोडी निराशा दाटून आली होती. पण त्यानंतर काही मिनिटांत भारताने दोन गोल डागत ३-३ अशी बरोबरी केली. हार्दिक सिंगने २७व्या मिनिटाला आणि नंतर हरमनप्रीतने २९व्या मिनिटाला गोल करत भारताला बरोबरी गाठून दिली. त्यानंतरच्या तिसऱ्या क्वार्टरमध्ये ३१ व्या मिनिटाला भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला आणि त्यात रुपिंदरने गोल करत भारताला ४-३ अशी आघाडी मिळवून दिली. आणखी तीन मिनिटांनी सिरमनजीतने आपला दुसरा गोल करत ५-३ अशी आघाडी मिळवून दिली. त्यामुळे भारतीयांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. चौथ्या क्वार्टरमध्ये जर्मनीने पेनल्टी कॉर्नरवर चौथा गोल करत पिछाडी भरून काढली. पण नंतर भारताने जर्मनीचे आक्रमण थोपवून धरले. त्यात श्रीजेशच्या गोलरक्षणाचा मोठा वाटा होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा