31 C
Mumbai
Friday, September 30, 2022
घरदेश दुनियासमरकंदला पंतप्रधान नरेंद्र मोदी- झी जिनपिंग येणार आमनेसामने

समरकंदला पंतप्रधान नरेंद्र मोदी- झी जिनपिंग येणार आमनेसामने

दोन दिवसांची शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ ) वार्षिक शिखर परिषद

Related

उझबेकिस्तानमधील समरकंद येथे होत असलेल्या दोन दिवसांच्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ ) वार्षिक शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच सहभागी होणार आहेत.

उझबेकिस्तानने आयोजित केलेल्या एससीओ शिखर परिषदेत व्यापार, अर्थव्यवस्था, संस्कृती आणि पर्यटन या क्षेत्रात परस्पर सहकार्यासाठी अनेक निर्णय घेतले जाण्याची शक्यता असल्याचं पंतप्रधान माेदी यांनी परिषदेत सहभागी होण्यापूर्वी ट्विट केलं आहे. समरकंदमध्ये आपण राष्ट्रपती मिर्जियाेयेव यांना भेटण्यासाठी देखील उत्सुक असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले या शिखर परिषदेत स्थानिक, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर तसेच एससीओ चा विस्तार आणि बहुआयामी आणि संस्थेतील परस्पर सहकार्य. आणखी सखोल होण्यासाठी कल्पनांचे आदान – प्रदान करण्यासाठी आपण उत्सुक आहोत. असं पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीमध्ये म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदी शुक्रवारी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ ) वार्षिक शिखर परिषदेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि इराणचे अध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्यासह इतर राष्ट्रप्रमुखांसह उपस्थित राहणार आहेत. उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्जियोयेव यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी उझबेकिस्तानला भेट देत आहेत. उझबेकिस्तान शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत.

हे ही वाचा:

जागतिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी विनेश फोगट पहिली भारतीय महिला

‘नवाब मलिकांच्या निर्दोषतेचा प्रश्नच उद्भवत नाही’

सर विश्वेश्वरय्यांनी अचानक रेल्वेची साखळी खेचली आणि सगळ्यांनाच धक्का बसला

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात पोलिस निरीक्षकाने केली होती विकृत पोस्टnews

या मुद्द्यांवर होणार चर्चा

पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या शिखर परिषदेत स्थानिक, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर तसेच एससीओ चा विस्तार आणि बहुआयामी आणि परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्यावर चर्चा होईल. होते. या शिखर परिषदेत सहभागी होणार्‍या इतर नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार असल्याची माहितीही पंतप्रधान मोदींनी दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,968चाहतेआवड दर्शवा
1,944अनुयायीअनुकरण करा
41,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा