31 C
Mumbai
Sunday, December 21, 2025
घरक्राईमनामाजाफर एक्स्प्रेसचे क्लियरन्स ऑपरेशन पूर्ण; ३३ बलूच लिबरेशन आर्मीच्या अपहरणकर्त्यांचा खात्मा

जाफर एक्स्प्रेसचे क्लियरन्स ऑपरेशन पूर्ण; ३३ बलूच लिबरेशन आर्मीच्या अपहरणकर्त्यांचा खात्मा

उर्वरित ओलिस प्रवाशांची घटनास्थळावरून सुटका

Google News Follow

Related

बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेसचे अपहरण केल्याने जगभरात मोठी खळबळ उडाली. स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीसाठी या परिसरात बलूच बिलरेशन आर्मी कार्यरत आहे. वेगळ्या बलुचिस्तानसाठी त्यांचा पाकिस्तानाविरुद्ध लढा सुरू असून यासाठी अनेकदा बलूच लिबरेशन आर्मीकडून हल्ले सुरू असतात. संपूर्ण ट्रेनचे अपहरण केल्यानंतर साऱ्या जगाचे लक्ष या घटनेकडे लागून होते. दरम्यान, बलुचिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेस ट्रेनच्या अपहरणानंतर सुरू करण्यात आलेले क्लियरन्स ऑपरेशन आता पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच हल्ल्याच्या ठिकाणी असलेले सर्व ३३ बलूच लिबरेशन आर्मीचे अपहरणकर्ते मारले गेल्याची माहिती पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया विंगने दिली आहे.

इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे (आयएसपीआर) महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी सांगितले की, “११ मार्च रोजी बोलानमध्ये बलूच लिबरेशन आर्मीच्या दहशतवाद्यांनी दुपारी १ वाजताच्या सुमारास रेल्वे ट्रॅकला लक्ष्य केले आणि तो उडवून दिला. जाफर एक्सप्रेस थांबवली. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, ट्रेनमध्ये ४४० प्रवासी होते.” पाकिस्तानने बंदी घातलेल्या बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.

लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी म्हणाले की, ज्या भागात ही घटना घडली त्या भागात जाणे कठीण होते कारण हे ठिकाणी रस्ते मार्गापासून फार दूर होते. लष्कर, हवाई दल, फ्रंटियर कॉर्म्स आणि स्पेशल सर्व्हिसेस ग्रुपच्या कर्मचाऱ्यांनी या ऑपरेशनमध्ये भाग घेतला आणि ओलिसांना सोडवले. हल्यात दहशतवाद्यांनी महिला आणि मुलांसह ओलिसांना मानवी ढाल म्हणून वापरले, असे त्यांनी सांगितले. सॅटेलाइट फोनद्वारे केलेल्या कारवाईदरम्यान हे दहशतवादी अफगाणिस्तानातील त्यांच्या समर्थक आणि सूत्रधारांशी संपर्कात होते. बुधवारी संध्याकाळी दहशतवाद्यांपासून सुमारे १०० प्रवाशांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आणि आज देखील मोठ्या संख्येने प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे, असे ते म्हणाले.

मंगळवारी सुमारे ४५० लोकांना घेऊन जाणारी जाफर एक्सप्रेसवर बलुच लिबरेशन आर्मीने बॉम्ब आणि बंदुकांनी हल्ला केला. ही ट्रेन क्वेटाहून पेशावरला जात असताना सिब्बीजवळील बोगद्यात अडवण्यात आली. BLA ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आणि म्हटले की त्यांच्याकडे २०० हून अधिक ओलिस होते, ज्यात बहुतेक सुरक्षा आणि गुप्तचर कर्मचारी होते. व्हॉइस ऑफ अमेरिका (व्हीओए) च्या वृत्तानुसार, या हल्ल्यात ट्रेन चालकाचा मृत्यू झाला आणि किमान ३७ लोक जखमी झाले, जे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.

हे ही वाचा:

हरियाणामध्ये भाजपाचे ट्रिपल इंजिन सरकार; काँग्रेस हद्दपार!

शिवाजी सावंत यांची ‘छावा’ कादंबरी आता इंग्रजीत !

जन्म – मृत्यूच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप

संथाल परगण्यात आदिवासी संख्या घटली मुस्लीम संख्या वाढली

सध्या सर्व ओलिस प्रवाशांना वाचवण्यात आले. उपस्थित असलेल्या सर्व दहशतवाद्यांना नरकात पाठवण्यात आले आहे आणि त्यांची एकूण संख्या ३३ होती, अशी माहिती अहमद शरीफ चौधरी यांनी दिली आहे. त्यांनी पुढे सांगितले की अंतिम क्लिअरन्स ऑपरेशनमध्ये कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. त्यांनी सांगितले की तीन तैनात एफसी कर्मचारी मारले गेले, तर मंगळवारी ऑपरेशन दरम्यान एक एफसी सैनिक मारला गेला. आयएसपीआर प्रमुखांनी सांगितले की बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड पुढील क्लिअरन्स करत आहे आणि ट्रेन तसेच आसपासच्या परिसराची तपासणी करत आहे. जनरल अहमद शरीफ चौधरी म्हणाले की ऑपरेशन दरम्यान आजूबाजूच्या परिसरात पळून गेलेल्या प्रवाशांनाही एकत्र केले जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा