29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरदेश दुनियाशिंजो आबे यांच्या अंत्यसंस्काराच्या निषेधार्थ समर्थकाने घेतले पेटवून

शिंजो आबे यांच्या अंत्यसंस्काराच्या निषेधार्थ समर्थकाने घेतले पेटवून

सीसीटीव्ही फुटेज गोळा करून संपूर्ण प्रकरणाचा तपास

Google News Follow

Related

जपानची राजधानी टोकियोमध्ये माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतले. जपानी टीव्ही असाही नुसार, शिंजो आबे यांच्या अंत्यसंस्काराचा निषेध करण्यासाठी एका व्यक्तीने जपानच्या पंतप्रधान कार्यालयाजवळील रस्त्यावर स्वतःला पेटवून घेतले. घटनास्थळी उपस्थित पोलीस कर्मचार्‍यांनीही आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र या आगीच्या भक्ष्यस्थानी पडून तो जळून खाक झाला. यानंतर दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर महानगर पोलीस विभाग आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज गोळा करून संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.

जपानी टीव्ही असाहीने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर मेट्रोपॉलिटन पोलिस विभाग आजूबाजूच्या परिसरातून सीसीटीव्ही फुटेज गोळा करून संपूर्ण घटनेचा तपास करत आहे. जपानच्या नारा शहरात प्रचाराच्या भाषणादरम्यान ८ जुलै रोजी आबे यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. सुमारे १० मीटर (३३ फूट) अंतरावरून दोन गोळ्या झाडल्या. या घटनेत आबे यांना जीव गमवावा लागला.

स्थानिक मीडियानुसार, जपान सरकारने माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या शासकीय अंत्यसंस्काराचे नियोजन २७ सप्टेंबर रोजी केले आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराला जगभरातील देशांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. जपानचे सर्वात जास्त काळ काम करणारे पंतप्रधान शिंजो आबे यांनी २०२० मध्ये आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिला. २००६ ते २००७ आणि पुन्हा २०१२ ते  २०२० असे दोनदा ते जपानचे पंतप्रधान होते.

हे ही वाचा:

पत्राचाळ प्रकरणातून मिळालेल्या पैशात संजय राऊत परदेश दौऱ्यावर गेले

“मास्क न वापरलेल्यांकडून कायद्याच्या कोणत्या तरतुदीनुसार दंड वसूल करण्यात आला?”

बायबलच्या ओळी वाचून पंतप्रधान ट्रस यांनी दिला एलिझाबेथना निरोप

अमरिंदर यांच्यासह त्यांचा पक्षही भाजपात विलिन

जपानमध्ये प्रशासकीय अंत्यसंस्कार ही एक प्रस्थापित प्रथा नाही आणि आंदोलकांनी अंत्यसंस्कारासाठी सार्वजनिक निधीच्या वापरावर नाराजी व्यक्त केली आहे. कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रॅटिक पार्टीने त्याचे खासदार पुढील आठवड्याच्या समारंभात सहभागी होणार नाहीत असे देशाच्या मुख्य विरोधी पक्षांने म्हटले आहे. सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की बहुतेक जपानी या कार्यक्रमाच्या विरोधात आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा