29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरदेश दुनियासुदानमध्ये जमिनीच्या वादावरून झालेल्या जातीय संघर्षात १७० जणांचा मृत्यू

सुदानमध्ये जमिनीच्या वादावरून झालेल्या जातीय संघर्षात १७० जणांचा मृत्यू

Google News Follow

Related

सुदानच्या दक्षिणेकडील ब्लू नाईल राज्यात जमिनीच्या वादावरून झालेल्या जातीय संघर्षात किमान १७० लोक ठार झाले आहेत. दोन आदिवासी जमातींमधील ही हाणामारी दोन दिवस चालली. सुदानमधील ही हिंसक घटना अलीकडच्या काही महिन्यांतील सर्वात भीषण घटना आहे. राजधानी खार्तूमच्या दक्षिणेस सुमारे ५०० किलोमीटर अंतरावर रोझरेसजवळील वड अल-माही परिसरात हा संघर्ष झाला.

गेल्या वर्षीच्या लष्करी बंडानंतर सुदान राजकीय अशांतता आणि आर्थिक संकटात अडकले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार ते गुरुवार या कालावधीत महिला, लहान मुले आणि वृद्धांसह एकूण १७० जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी वड अल-माही भागातील रहिवाशांनी घरांमध्ये जोरदार गोळीबार आणि आग लागल्याची माहिती दिली.

हे ही वाचा:

रितेश, जीनिलीयाच्या कंपनीवर मेहेर नजर का?

ठाकरेंचे खोके, एकदम ओके; खोक्यांचा धुरळा आता कोर्टात

सरकारकडून १०० रुपयात ‘आनंदाचा शिधा’

अजित पवार यांनी का घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट?

संयुक्त राष्ट्र कार्यालयाने सांगितले की, गेल्या आठवड्यात याच प्रदेशात जमिनीच्या वादावरून झालेल्या संघर्षात किमान १३ लोक मारले गेले तर २४ जखमी झाले होते . तेव्हापासून, अधिकार्‍यांनी हिंसाचार रोखण्यासाठी प्रदेशात रात्रभर कर्फ्यू लागू केला आहे. आतापर्यंत या प्रदेशात ६५,००० लोकांना त्यांची घरे सोडण्यास भाग पाडले गेले आहे., हौसा लोक आणि इतर गटांमध्ये पहिल्यांदा जुलैमध्ये लढाई सुरू झाली. ऑक्टोबरच्या सुरूवातीस एकूण १४९ लोकांचा मृत्यू झाल्याचे म्हटल्या जात आहे

सुदानमध्ये संतप्त निदर्शने सुरू झाली

नुकत्याच ठार झालेल्यांना न्याय मिळावा या मागणीसह संपूर्ण सुदानमध्ये संतप्त निदर्शने सुरू झाली आहेत. या प्रदेशातील वरिष्ठ नेत्यांनी जुलै अखेरपर्यंत शत्रुत्व संपवण्याचे मान्य केले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा