पाकिस्तानी नागरिकांना भारतामधील जीवनशैलीची, भारताच्या प्रगतीची भुरळ पडल्याचे अनेकदा समोर आले आहे. यासंबंधीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशीचं एक टिपण्णी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. पाकिस्तानी डिझायनर आणि अभिनेते दीपक पेरवानी यांनी भारत आणि पाकिस्तानमधील जीवनाची तुलना करणारी टिप्पणी केली आणि याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका मुलाखतीत पेरवानी म्हणाले की, शेजारील देशातील जीवन पाकिस्तानपेक्षा चांगले आहे.
एका कार्यक्रमात बोलताना पेरवानी यांनी भारतातील स्वातंत्र्य, आनंद आणि पायाभूत सुविधांचा झालेला विकास याचा हवाला देऊन दोन्ही देशांमधील फरकांबद्दल आपले विचार मांडले. दीपक परवानी म्हणतात की, “मी आता इथे आयुष्य घालवले आहे. पण जर आपण तिथल्या (भारतात) आणि इथल्या (पाकिस्तान) आयुष्याची तुलना केली तर त्यांच्याकडे (भारतीयांकडे) ते अधिक चांगले आहे,” असे पेरवानी म्हणाले. पुढे ते म्हणाले, भारतात लोक अधिक आनंदी आहेत. तिकडे स्त्रिया मोकळेपणाने फिरू शकतात, सायकल आणि मोटारसायकल चालवू शकतात. अगदी पाणीपुरी विक्रेतेही टॅब्स वापरतात. त्यांच्याकडे फुटपाथ आहेत आणि इतर सुविधा आहेत.
हे ही वाचा..
दावोसमधून पहिल्याचं दिवशी सहा लाख कोटींहून अधिकची विक्रमी गुंतवणूक
बीड हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार घोषित!
केरळचे पिनराई सरकार अडचणीत; पीपीई किट खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा!
वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!
दीपक पेरवानी म्हणाले की, मी जे बोलत आहे ते श्रीमंत किंवा गरीब या बद्दल नाही, तर परिसर, वातावरण, हवा आणि जीवन जगण्यायोग्य बनवणाऱ्या आवश्यक गोष्टींबद्दल आहे. सुदैवाने, इकडे लाहोरमध्ये काही गोष्टी अशा आहेत पण, कराचीमध्ये काहीही नाही. भारतात गेल्यावर जयपूर अधिक चांगले वाटले. एक डिझायनर म्हणून पाहिल्यास जयपूरमध्ये सर्व आहे. वास्तुकला, रंग, पर्यावरण, शैली अगदी सर्वकाही आहे.







