27 C
Mumbai
Tuesday, September 28, 2021
घरदेश दुनियामध्य रेल्वेने केला ऑलिम्पियन महिला हॉकीपटूंचा गौरव

मध्य रेल्वेने केला ऑलिम्पियन महिला हॉकीपटूंचा गौरव

Related

टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारतीय महिला हॉकी संघाने ऐतिहासिक कामगिरी केली. या महिला हॉकी संघाचे सर्वस्तरातून कौतुक होत असून यातील १३ महिला खेळाडू भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. यामध्ये भारतीय महिला हॉकी संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मध्य रेल्वेच्या ऑलिम्पिक महिला हॉकी खेळाडूंचा नुकताच मध्य रेल्वेकडून सत्कार करण्यात आला.

मध्य रेल्वेच्या मुख्यालयात ऑलिम्पिक महिला हॉकीपटूंचा सत्कार कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले होते.

१६ सदस्यांच्या भारतीय महिला हॉकी संघातील १३ खेळाडू भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात तिकिट तपासणी संवर्गात काम करणारे चारही खेळाडू मोनिका मलिक (हेड टीसी), वंदना कटारिया (हेड टीसी), सुशिला चानू पुखरांबम (हेड टीसी), रजनी एतिमारपु (हेड टीसी) यांची भारतीय ऑलिम्पिक महिला हॉकी संघात निवड झाली आहे. हे खेळाडू मागील काही वर्षांपासून मध्य रेल्वेकडून सराव आणि खेळत आहेत. त्यांचे प्रशिक्षक हेलन मेरी (अर्जुन पुरस्कार प्राप्त) आणि सरिता ग्रोव्हर या असून त्या देखील मध्य रेल्वेत कार्यरत आहेत.

मध्य रेल्वेचे महाव्यस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी वंदना कटारिया, मोनिका मलिक, सुशीला चानू आणि रजनी एतिमारपू यांचा सत्कार केला. महाव्यस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी सत्कार कार्यक्रमात बोलत असताना सांगितले की, ‘मध्य रेल्वेच्या चार खेळाडूंचा सत्कार करताना अत्यंत आनंद होत आहे.

ते म्हणाले की, मध्य रेल्वे सर्वसाधारणपणे खेळांना आणि विशेषत: हॉकीला प्रोत्साहन देत राहील, जेणेकरून खेळाडू देशाला गौरवान्वित करतील. क्रीडा मैदाने आणि खेळाडूंच्या सुविधांना प्राधान्य दिले जाते. शिवाय प्रशिक्षक पुरवले जातील जेणेकरून खेळाडू भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार होतील.’

हे ही वाचा:

अरेरे! नवरा गेला, चिमुरड्यांचीही तिने केली हत्या

मुंबईतील वाहनांवर चोर स्वार!

राष्ट्रकुल सुवर्ण विजेते,महाराष्ट्र केसरी पैलवान आप्पालाल शेख कालवश

वरुण सरदेसाईंना लागली संस्कारांची चिंता

मुंबई विभागात काम करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करताना महाव्यवस्थापक म्हणाले की, मध्य रेल्वेच्या महिला हॉकीपटूंनी ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल अभिमान आहे. त्यांनी वंदना कटारिया हिचे अभिनंदन केले. ती ऑलिम्पिकमध्ये हॉकीमध्ये हॅटट्रिक गोल करणारी पहिली भारतीय महिला ठरली. कशाचीही पर्वा न करता हॉकी खेळण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी खूप चांगले प्रोत्साहन दिले जात असल्याबद्दल खेळाडूंनी रेल्वे प्रशासनाचे आभार मानले. आजच्या सत्कार कार्यक्रमाला बी. के. दादाभॉय, अतिरिक्त महाव्यवस्थापक मनोज शर्मा, मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) आणि अध्यक्ष, मध्य रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशन (CRSA) आणि मध्य रेल्वेचे सर्व विभाग प्रमुख तथा शलभ गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग आणि मान्यताप्राप्त कामगार संघटनाचे पदाधिकारी, खेळाडू आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,414अनुयायीअनुकरण करा
3,610सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा