34 C
Mumbai
Wednesday, October 27, 2021
घरदेश दुनियामुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय निवडणूक; अर्ज घेताना निवडणूक अधिकारीच गायब

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय निवडणूक; अर्ज घेताना निवडणूक अधिकारीच गायब

Related

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या कार्यकारी मंडळाची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून १२ ते १४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर केले जाणार आहेत, पण दुर्दैवाने निवडणूक अधिकारी निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज सादर होत असताना अनुपस्थित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत आरटीआय कार्यकर्ते आणि आजीव सभासद अनिल गलगली यांनी खंत व्यक्त केली आहे.

आरटीआय कार्यकर्ते आणि आजीव सभासद अनिल गलगली यांनी बुधवारी उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज सादर केला. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या कार्यालयात निवडणूक अधिकारी उपस्थित असणे बंधनकारक असताना त्यांचा थांगपत्ता नव्हता. तेथील कार्यालयाने अर्ज स्वीकार केला पण निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक अधिकारी आणि एकूण व्यवस्थेचा गलथान कारभार समोर आला आहे. अनिल गलगली यांनी निवडणूक अधिकारी यांच्या निष्काळजीपणाची तक्रार धर्मादाय आयुक्तांसहित ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे.

 

हे ही वाचा:

बळी राजाची पुन्हा निराशाच! ठाकरे सरकारकडून पुरेशी मदत नाहीच

…कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या भ्रष्टाचाराबद्दल काँग्रेसचेच नेते कुजबुजले

पत्रकार परिषदेत महाराष्ट्र सोडून पवार पोहोचले थेट ‘पॅरिस’मध्ये

‘नेटफ्लिक्सकडून वेबसिरीज बनवली तर अजित पवारांना मिळतील दोन कोटी’

 

कार्यकारी मंडळ १५ चे असून सद्यस्थितीत १ अध्यक्ष आणि ७ उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. मागील ब-याच वर्षांपासून निवडणूक नावाचा प्रकार येथे नसून नेमणुका करण्यात येत असत. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा निवडणूक वादाला आता आणखी एक वळण प्राप्त झाले आहे. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या १५ जणांच्या कार्यकारिणीचा कार्यकाळ  १९८९च्या घटनेनुसार ३ वर्षाचा आवश्यक असताना धर्मादाय आयुक्तांची कोठल्याही प्रकारची परवानगी न घेता नियमबाह्य कार्यकाळ वाढविला जात असल्याच्या आरोप अनिल गलगली यांनी केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,446अनुयायीअनुकरण करा
4,450सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा