28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरदेश दुनियाभारताच्या 'सारंग' ची होणार रशियात हवा

भारताच्या ‘सारंग’ ची होणार रशियात हवा

Google News Follow

Related

रशियात सध्या ‘माक्स’ हा जागतिक दर्जाचा हवाई कसरतींचा समारंभ सुरू आहे. भारत पहिल्यांदाच या समारंभात सहभागी होणार आहे. भारतीय हवाई दलाची ‘सारंग’ ही हेलिकॉप्टर या समारंभात सहभागी होऊन जमलेल्या नागरिकांना हवाई कसरती दाखवणार आहेत.

रशियातील माक्स हे हवाई प्रदर्शन द्वैवार्षिक स्वरूपाचे असते यावर्षी आजपासून अर्थात २० जुलैपासून या प्रदर्शनाला सुरुवात होणार आहे तर २५ जुलै पर्यंत हे प्रदर्शन रंगणार आहे. हवाई कसरतींमध्ये सारंग संघातील चार हेलिकॉप्टर सहभागी होणार आहेततर. त्यासोबत भारतात निर्माण झालेले ‘ध्रुव’ हे हलक्या वजनाचे आधुनिक हेलिकॉप्टरही सहभागी होणार आहे. एचएएल या कंपनीने सारंग या हेलिकॉप्टरची निर्मिती केली आहे.

हे ही वाचा:

पालिकेत हा कुठल्या ‘पेंग्विन गँग’चा भ्रष्टाचार सुरू आहे?

गणेशमूर्ती साकारणारे हात पुन्हा आर्थिक विवंचनेत

शिवाजी पार्कात अभिनेत्री सविता मालपेकरांची सोनसाखळी चोरली

ठाण्यातील ‘छम छम’ मुळे दोन पोलिसांचे निलंबन, तर दोघांची बदली

ही हेलिकॉप्टर्स हिंजलेस रोटर्स असलेली आहेत आणि अतिशय कौशल्यपूर्ण असे हवाई तंत्रज्ञान वापरून त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. भारतीय हवाई दलासह भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलसुद्धा या हेलिकॉप्टरचा वापर करतात. २००३ साली सारंग हेलिकॉप्टरच्या संघाची स्थापना बंगळुरू येथे करण्यात आली. तर २००४ मध्ये सिंगापूर येथे आशियाई हवाई कसरती मध्ये या संघाचा पहिला आंतरराष्ट्रीय अविष्कार पाहायला मिळाला. आजपर्यंत सारंगने संयुक्त अरब अमिराती, बहारीन, श्रीलंका आणि मॉरिशस येथे झालेल्या हवाई कसरती आणि विशेष प्रसंगीच्या उत्सवी प्रदर्शनात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा