31 C
Mumbai
Thursday, December 1, 2022
घरदेश दुनियाभारतीय वंशाचे श्रीराम कृष्णन होणार ट्विटरचे सीईओ ?

भारतीय वंशाचे श्रीराम कृष्णन होणार ट्विटरचे सीईओ ?

श्रीराम कृष्णन होणार ट्वीटर चे सीईओ ?

Google News Follow

Related

ट्विटरची मालकी घेतल्यानंतर एलन मस्कने अनेक उच्च अधिकाऱ्यांना कामावरून काढून टाकले. त्याच वेळी, मस्कच्या ट्विटरच्या संदर्भात नवीन योजनांमुळे खळबळ उडाली आहे. खरे तर पराग अग्रवाल यांची हालकपट्टी केल्यानंतर पराग अग्रवाल यांची जागा कोण घेणार? असा प्रश्‍न निर्माण झाला होता. या दरम्यान मिळालेल्या माहितीवरुन परागची जागा भारतीय वंशाचे श्रीराम कृष्णन घेणार असल्याचे समजते. याबाबतचे संकेतही एका ट्विटमध्ये दिले आहेत.

ट्विटरचे नवे भारतीय वंशाचे सीईओ श्रीराम कृष्णन चेन्नई येथे लहानाचे मोठे झाले. तसेच चेन्नईत त्यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. २००५ मध्ये, ते अमेरिका येथील सिएटल येथे गेले आणि मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी सुरू केली. कृष्णन हे तंत्रज्ञ आणि अभियंता आहेत. त्यांनी नुकत्याच सुरू होणाऱ्या स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली होती. आतापर्यंत कृष्णन यांनी अशी २३ उद्योगात गुंतवणूक केली आहे. अशा स्थितीत भारतीय तंत्रज्ञ श्रीराम कृष्णन यांचे ट्विट ही महत्त्वाची जबाबदारी घेण्यास तयार असल्याचे संकेत देत आहेत.

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींना जीवे मारण्याची धमकी

रस्ते अपघात मृत वारकऱ्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून पाच लाख

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी

भारतीय तंत्रज्ञ श्रीराम कृष्णन हे स्टार्टअप म्हणजेच Undrissen Horowitz कंपनीचे महाव्यवस्थापक आहेत. याशिवाय, श्रीराम कृष्णन यांनी Hopein आणि Polyworks च्या बोर्डवर तसेच Twitter वर मुख्य ग्राहक संघाचे नेतृत्व केले आहे. कृष्णन यांनी होम टाइमलाइन, नवीन वापरकर्ता अनुभव, शोध, डिस्कव्हरी अशा अनेक ठिकाणी काम केले. त्याआधी, त्याने स्नॅप आणि फेसबुकसाठी विविध मोबाइल जाहिरात उत्पादनांवर काम केले. यामध्ये स्नॅपचा डायरेक्ट रिस्पॉन्स अँड बिझनेस आणि फेसबूक ऑडियंस नेटवर्क या पदांवर काम केले आहे. श्रीरामने मायक्रोसॉफ्टमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. तेथे त्यांनी विंडोज असूसशी संबंधित अनेक प्रकल्पांमधून काम केले आहे. तसेच प्रोग्रॅमिंग विंडोज अझूर या पुस्तकाचे ते लेखक ही आहेत. एवढेच नाही तर श्रीरामन यांची पत्नी आरती राममूर्तीसोबत एक यूट्यूबवर पॉडकास्ट चॅनलही चालवतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,948चाहतेआवड दर्शवा
1,976अनुयायीअनुकरण करा
52,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा