युक्रेन आणि रशिया या दोन देशांमध्ये २०२२ मध्ये युद्धाला सुरुवात झाली होती. बलाढ्य रशियासमोर युक्रेन काही दिवसांत गुडघे टेकेल अशी शक्यता वर्तवण्यात येत असतानाचं युक्रेनने माघार घेतली नाही. दिवस सरले, महिने उलटले आणि आता तीन वर्षे झाली तरी युक्रेनचा लढा सुरू आहे. युद्ध जरी या दोन देशांमध्ये सुरू झाले असले तरी त्याचे परिणाम जागतिक पातळीवर उमटले आहेत. दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेवर या युद्धाचे गंभीर परिणाम झाले आहेत.
काही पाश्चिमात्य देशांकडून युक्रेनला अर्थबळ सुरू होते तर, यात महत्त्वाची भागीदारी होती ती बायडन प्रशासनाखालील अमेरिकेची. मात्र, डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेमध्ये निवडणून आल्यापासून आता युक्रेनला फार काळ अमेरिकेवर अवलंबून राहता येणार नसल्याचे चित्र आहे. सोमवारी युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला तीन वर्षे पूर्ण झाली. याचं पार्श्वभूमीवर एनडीटीव्हीने दोन्ही देशांचा अर्थकारणाचा आढावा घेतला आहे.
आर्थिक आणि लष्करी वचनबद्धतेसाठी युक्रेन हा आपला सर्वात मोठा मित्र अमेरिकेवर अवलंबून राहू शकेल की नाही याची त्यांना खात्री नाही, कारण त्यांची अर्थव्यवस्था मंदीची चिन्हे दाखवत असून त्यांचे सैन्य कसेबसे शत्रूविरुद्ध लढत आहेत. दुसरीकडे रशियामध्येही काहीशी बरी स्थिती नाही. महागाईमुळे रशियाची अर्थव्यवस्था थंडावण्याची चिन्हे दिसत आहेत.
दुसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यापासून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनमध्ये निवडणुका घेण्याचा आग्रह धरला आहे. त्यांनी झेलेन्स्की यांना हुकूमशहा असे संबोधले आहे, हे स्पष्टपणे २०२४ मध्ये युक्रेनियन नेत्याचा अधिकृत पाच वर्षांचा कार्यकाळ संपत आहे याचा संदर्भ आहे. तीन वर्षांपूर्वी रशियाने आक्रमण केल्यावर सुरू केलेल्या युद्धासाठी त्यांनी युक्रेन जबाबदार असल्याचा आरोपही केला आहे. ट्रम्प यांना रशियाविरुद्धच्या युक्रेनच्या युद्धाला पाठिंबा देण्यासाठी पाठवलेल्या अब्जावधी डॉलर्सचे पैसे परत मिळवायचे आहेत. युद्धकाळातील मदतीची भरपाई म्हणून ट्रम्प यांना खनिज संसाधनांचा करार हवा आहे, अशी चर्चा वॉशिंग्टन कीवशी करत आहे. दरम्यान, ट्रम्प प्रशासनाने राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित केल्यानंतर युक्रेनमधील युद्ध संपवण्याबाबत चर्चा करण्यासाठी मॉस्कोशी चर्चा सुरू केली आहे. आतापर्यंत, कीवला वाटाघाटींपासून दूर ठेवण्यात आले आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध ही जागतिक आर्थिक आपत्ती ठरेल, याचा अंदाज सुरुवातीपासून बांधण्यात येत होता. सीमेच्या दोन्ही बाजूंनी जाहीर झालेल्या महागाईच्या आकडेवारीवरून या देशातील नागरिकांवर संघर्षाचा सतत होणारा परिणाम दिसून आला तर महागाईही स्पष्ट झाली आहे. रशियामध्ये ९.५ टक्के आणि युक्रेनमध्ये १२ टक्के किंमतीत वाढ झाली आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या आकडेवारीनुसार, युद्धाच्या सुरुवातीला रशियाचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) -१.३ टक्क्यांपर्यंत घसरले होते परंतु त्यानंतर गेल्या दोन वर्षांत ते ३.६ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. परंतु आता उच्च व्याजदर आणि महागाईमुळे विविध क्षेत्रांमध्ये झालेल्या विक्री आणि ऑर्डरमध्ये झालेल्या घटमुळे रशियन अर्थव्यवस्था थंडावण्याची चिन्हे दिसत आहेत. अनेक उद्योगांमध्ये गती मंदावली आहे. अन्न उद्योग, रासायनिक उद्योग, लाकूड उत्पादन आणि यंत्रसामग्रीच्या काही क्षेत्रांमध्ये व्यवसायांकडून येणाऱ्या ऑर्डरचे प्रमाण कमी होत आहे, अशी माहिती रशियाचे अर्थमंत्री मॅक्सिम रेशेतनिकोव्ह यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की त्यांचे मंत्रालय चलन विषयक आणि राजकोषीय धोरणांना जोडण्यासाठी मध्यवर्ती बँक आणि अर्थ मंत्रालयासोबत काम करत आहे.
हे ही वाचा:
पीएम-किसान योजनेला सहा वर्षे पूर्ण; १० कोटी लाभार्थ्यांना मिळणार २००० रुपये
“शरद पवार गप्प कसे राहू शकतात?” नीलम गोऱ्हेंच्या विधानावरून संजय राऊत संतापले
‘हफ्ता वसूली’ कार्यक्रमात सांस्कृतिक मूल्यांचे उल्लंघन केल्याबद्दल मुनावर फारुकी विरुद्ध तक्रार
USAID मधील २००० पदे रद्द; हजारो कर्मचारी पगारी रजेवर
युक्रेनच्या अर्थ मंत्रालयाच्या अंदाजानुसार, या वर्षी जीडीपी वाढ २.७ टक्क्यांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे, जी बहुतेक युक्रेनियन विश्लेषक आणि अर्थतज्ज्ञांच्या अपेक्षेपेक्षा ३-४ टक्क्यांपेक्षा कमी आहे. युक्रेन आपल्या वीज बाजारपेठेवर आणि धातूच्या साठ्यांवर टिकून आहे. पुढील १० वर्षांचा विचार करता, युक्रेनमध्ये धातूंचे साठे भरपूर आहेत, त्यापैकी बरेच दुर्मिळ आहेत, जे काही अंदाजानुसार ११ ट्रिलियन डॉलर्स इतके आहेत.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी जमीन, समुद्र आणि हवाई मार्गाने आक्रमण करण्याचे आदेश दिल्यापासून हजारो युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि ६० लाखांहून अधिक लोक परदेशात निर्वासित म्हणून राहत आहेत. लष्करी नुकसान भयानक राहिले आहे. याची माहिती गुप्त ठेवलेली असली तरी काही अहवालांनुसार दोन्ही बाजूंनी लाखो लोक मारले गेले आहेत किंवा जखमी झाले आहेत.