देशभरातील बळीराजासाठी दिलासा देणारी बातमी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे होळीपूर्वी सोमवार, २४ फेब्रुवारी रोजी किसान सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता देणार आहेत. किसान सन्मानाच्या १९ व्या हप्त्यानुसार, शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा होणार आहेत. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही किसान सन्मानला सहा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ट्विट करून अभिनंदन केले आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी बिहारमधील भागलपूरला भेट देणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम-किसान योजनेला सहा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ट्विट केले आहे आणि म्हटले की, “पीएम-किसान योजनेला सहा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशभरातील आपल्या शेतकरी बंधू आणि भगिनींना खूप खूप शुभेच्छा. आतापर्यंत त्यांच्या खात्यात जवळपास ३.५ लाख कोटी रुपये पोहोचले आहेत ही माझ्यासाठी खूप समाधानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आमच्या या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना आदर, समृद्धी आणि नवीन शक्ती मिळत आहे.”
पीएम-किसान के 6 वर्ष पूरे होने पर देशभर के हमारे किसान भाई-बहनों को बहुत-बहुत बधाई। मेरे लिए अत्यंत संतोष और गर्व का विषय है कि अब तक करीब साढ़े तीन लाख करोड़ रुपये उनके खाते में पहुंच चुके हैं। हमारा ये प्रयास अन्नदाताओं को सम्मान, समृद्धि और नई ताकत दे रहा है। #PMKisan
— Narendra Modi (@narendramodi) February 24, 2025
एनडीए सरकारच्या काळात भारतीय शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या आर्थिक मदतीबद्दल ते म्हणाले, “गेल्या १० वर्षांत आमच्या प्रयत्नांमुळे देशातील कृषी क्षेत्राचा वेगाने विकास झाला आहे. आपल्या लाखो लहान शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीमुळे बाजारपेठेतील त्यांची उपलब्धता वाढली आहे. यासोबतच शेतीचा खर्च कमी झाला आहे आणि त्यांचे उत्पन्नही वाढले आहे.
पंतप्रधान मोदी एक दिवसाच्या बिहारमधील भागलपूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान, ते भागलपूरमधील किसान सन्मान निधी योजनेच्या सुमारे १० कोटी लाभार्थ्यांना किसान सन्मानाचे १९ वा हप्ता पाठवणार आहेत. सुमारे २३,००० कोटी रुपये ते पाठवतील. डायरेक्ट बँक ट्रान्सफर (DBT) पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा केले जातील.
हे ही वाचा:
“शरद पवार गप्प कसे राहू शकतात?” नीलम गोऱ्हेंच्या विधानावरून संजय राऊत संतापले
‘हफ्ता वसूली’ कार्यक्रमात सांस्कृतिक मूल्यांचे उल्लंघन केल्याबद्दल मुनावर फारुकी विरुद्ध तक्रार
USAID मधील २००० पदे रद्द; हजारो कर्मचारी पगारी रजेवर
विराटचा विजयी चौकार आणि पाकिस्तान सीमापार
यावेळी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण ३.४६ लाख कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत आणि १९ वा हप्ता जारी झाल्यानंतर ही रक्कम ३.६८ लाख कोटी रुपये होईल. पंतप्रधानांच्या बिहार दौऱ्यापूर्वी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान रविवारी, एक दिवस आधी दरभंगा येथे पोहोचले, जिथे ते स्थानिक शेतकऱ्यांसोबत मखानाच्या लागवडीत काम करत होते.