30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरधर्म संस्कृतीयंदाही नियमांचा नवरात्रोत्सव!

यंदाही नियमांचा नवरात्रोत्सव!

Google News Follow

Related

एकीकडे राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घाट होत असतानाच हिंदू सणांवरचे निर्बंध कायम ठेवले जात आहेत. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवाच्या दृष्टीने शिवसेना शासित मुंबई महापालिकेने नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार मुंबईत यावर्षीही दांडिया आणि गरबावर बंदी घातली गेली आहे. तर देवीच्या मूर्तीवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. नियमावलीत सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळातील देवीच्या मूर्तीची उंची चार फूट असावी, तर घरगुती मूर्ती दोन फूट असावी अशी बंधने घालण्यात आलेली आहेत.

नवरात्रोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी पालिकेकडून पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असून त्यासाठी ऑनलाईन सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. यंदा विनाशुल्क परवानगी देण्यात येत आहे. आगमन- विसर्जनासाठीही पालिकेकडून बंधने घालण्यात आली आहेत. तसेच गरबा- दांडियाचे आयोजन न करता आरोग्य आणि समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करावे, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. देवीच्या दर्शनासाठी ऑनलाईन व्यवस्था करावी असेही पालिकेकडून सांगण्यात आलेले आहे.

हे ही वाचा:

खळबळजनक! मुंबईच्या केईएममध्ये एमबीबीएसच्या २९ विद्यार्थ्यांना कोरोना

गृह खात्याचे उपसचिव कैलास गायकवाड ईडीसमोर जाणार?

‘खासगी रुग्णालयांनी केली कोरोना रुग्णांची सर्वाधिक लूट’

… आता निश्चितच काँग्रेसमध्ये राहणार नाही

गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवात प्रसाद वाटप, जाहिराती यावर बंदी घालण्यात आलेली आहे. पर्यावरणाचा विचार करता मूर्ती शाडूची असावी, सजावटही पर्यावरणपूरक असावी, असे नियमावलीत म्हटले आहे. घरगुती मूर्तीच्या आगमन- विसर्जनासाठी पाच व्यक्ती आणि सार्वजनिक मूर्तीच्या आगमन- विसार्जानासाठी १० जणांना उपस्थित राहता येणार आहे. या व्यक्तींना दोन प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेऊन १५ दिवस पूर्ण झालेले असावेत अशा सूचना करण्यात आल्या आहेत. मूर्तीचे विसर्जन शक्यतो घरी करावे किंवा गर्दी न करता नैसर्गिकस्थळी करावे करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या नियमांचे पालन न केल्यास नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा