29 C
Mumbai
Monday, September 26, 2022
घरधर्म संस्कृती'कोणताही देव उच्च जातीचा नसतो'

‘कोणताही देव उच्च जातीचा नसतो’

Related

दिल्लीतील जेएनयूमध्ये होणाऱ्या आंदोलनामुळे जेएनयू नेहमीच चर्चेत असते. मात्र, सध्या जेएनयूच्या कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी यांच्या विधानामुळे जेएनयू चर्चेत आले आहे. त्या म्हणाल्या, हिंदू देव-देवता उच्च जातीचे नाहीत. भगवान शंकरदेखील अनुसूचित जाती-जमाती म्हणजेच शूद्र असू शकतात. मानवजातीच्या विज्ञानानुसार देव उच्च जातीचे नाहीत, असं त्या म्हणाल्या आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत आंबेडकरांचे लैंगिक न्यायाबद्दलचे विचार: समान नागरी संहिता डीकोडिंग या विषयावर व्याख्यान देताना शांतीश्री धुलीपुडी हे बोलल्या आहेत. सर्व स्त्रियांना उद्देशून त्या म्हणाल्या, मनुस्मृतीत महिलांना शूद्रांचा दर्जा देण्यात आला आहे. महिलांना त्यांच्या वडिलांकडून किंवा पतीकडून जात मिळते. हे प्रतिगामी असण्याचं लक्षण आहे.

मानवजातीच्या शास्त्रानुसार माता लक्ष्मी, शक्ती अगदी भगवान जगन्नाथही उच्च जातीतून आलेले नाहीत. भगवान जगन्नाथ हे खरे तर आदिवासी वंशाचे आहेत. मग आजही आपण हा भेदभाव का करतोय जो अत्यंत अमानवी आहे. हिंदू धर्म हा धर्म नाही, ती जीवनपद्धती आहे, असे शांतीश्री धुलीपुडी यांनी आपले मतं मांडले आहे. आपल्या समाजातील उपजत, संरचित भेदभावावर आपल्याला जागृत करणारे गौतम बुद्ध हे पहिले होते, असंही धुलीपुडी म्हणाल्या आहेत.

हे ही वाचा:

आसाममध्ये बाहेरून येणाऱ्या इमामांना नोंदणी करावी लागणार

विधानभवनाजवळ शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

जागतिक वडापाव दिन: मुंबईची ओळख असणाऱ्या वडापावचा जन्म कसा झाला झाला?

डान्सर सपना चौधरीला होणार अटक?

तुमच्यापैकी बहुतेकांना मानववंशशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपल्या देवांचे मूळ माहित असले पाहिजे. देवांपैकी कोणीही ब्राह्मण नाही, सर्वोच्च क्षत्रिय आहे. भगवान शिव हे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीतील असले पाहिजेत कारण ते स्मशानभूमीत सापासोबत बसतात आणि त्यांच्याकडे कपडे घालण्यासाठी फारच कमी कपडे आहेत, असंही शांतीश्री धुलीपुडी म्हणाल्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,965चाहतेआवड दर्शवा
1,943अनुयायीअनुकरण करा
40,200सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा