‘द सनातन धर्म : ट्रू सोर्स ऑफ ऑल सायन्सेस’ या पुस्तकाचे लेखन करणारा युवा लेखक विवान कारुळकर याला वर्ल्ड रेकॉर्ड्स विद्यापीठाच्या माध्यमातून मानद डॉक्टरेट देण्यात आली आहे. वयाच्या १६व्या वर्षी विवानने हे पुस्तक लिहिले. अगदी कमी वयात सनातन धर्म या विषयावरील पुस्तकाचे लेखन केल्याबद्दल हा पुरस्कार देऊन विवानचा गौरव करण्यात आला आहे. पदक आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
हे ही वाचा:
‘केजरीवाल, सिसोदिया आणि आतिशी यांनी उर्जा वाचवून ठेवावी, दररोज न्यायालयात जावे लागणार’
केरळच्या पलक्कडमध्ये झळकले हमास, हिजबुल्ला दहशतवाद्यांचे पोस्टर्स
हनुमान चालिसा म्हणणाऱ्या भक्तांवर दगडफेक
महाकुंभच्या सेक्टर ८ मधील कॅम्पमध्ये लागली आग!
सखोल अभ्यास आणि संशोधनाच्या माध्यमातून विवानने सनातन धर्म आणि विज्ञान यांची सांगड घातली आहे. हे पुस्तक इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती भाषांमध्ये प्रकाशित झाले आहे. प्रसिद्ध उद्योगपती व कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कारुळकर आणि कारुळकर प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष शीतल कारुळकर यांचा सुपुत्र असलेल्या विवानच्या या लेखनाचे देशविदेशातील नामवंतांनी कौतुक केले आहे.
हा पुरस्कार मिळाल्यानंतर विवानने आपल्या प्रयत्नांना पाठबळ दिल्याबद्दल संस्थेचे आभार मानले आहेत.