विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील गोडपिंपरी नगरपंचायतीच्या ८ नगरसेवकांनी आज (१७ फेब्रुवारी) शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. यामुळे यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस आणि उबाठा गटाला खिंडार पडले आहे. गोडपिंपरी नगरपंचायतीमधील १७ पैकी ८ नगरसेवकांनी शिवसेना मुख्यनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत शिवसेनेत प्रवेश केल्याचे शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी सांगितले. मुंबईत झालेल्या या पक्ष प्रवेश सोहळ्यावेळी शिवसेना पूर्व विदर्भ समन्वयक आमदार नरेंद्र भोंडेकर यावेळी उपस्थित होते.
राज्याच्या विधानसभा पार पडल्यानंतर विरोधी पक्षाला उतरती कळा लागल्याचे चित्र दिसत आहे. मविआमधील अनेक बड्या नेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांनी महायुतीमध्ये सहभागी झाले आहेत, अजूनही भरती सुरूच आहे. काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उबाठाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थित हा पक्ष प्रवेश पार पडला.
उबाठा गटाचे रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवी यांनी पक्षातील उपनेतेपदाचा राजीनामा देत १३ फेब्रुवारी रोजी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. कोकणातील लांजा, राजापूर आणि साखरपा परिसरात राजन साळवी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. राजन साळवी यांच्या जाण्याने ठाकरे गटाला कोकणात मोठे नुकसान होणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीपूर्वी अनेक बड्या नेत्यांसह हजारो कार्यकर्त्ये महायुती सामील होतील, असा दावा सत्ताधारी नेत्यांकडून करण्यात येत आहे.
हे ही वाचा :
युवा लेखक म्हणून विवान कारुळकरला वर्ल्ड रेकॉर्ड्स विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट
केरळच्या पलक्कडमध्ये झळकले हमास, हिजबुल्ला दहशतवाद्यांचे पोस्टर्स
‘केजरीवाल, सिसोदिया आणि आतिशी यांनी उर्जा वाचवून ठेवावी, दररोज न्यायालयात जावे लागणार’