32 C
Mumbai
Monday, June 21, 2021
घर राजकारण महाराष्ट्रातही चित्रीकरणाला परवानगी द्या

महाराष्ट्रातही चित्रीकरणाला परवानगी द्या

Related

ब्रेक द चेन अंतर्गत पुन्हा एकदा लॉकडाऊन लागला. चित्रिकरण थांबलं. गेल्या वेळी पडला तसा खंड पडू नये म्हणून अनेक निर्मात्यांनी परराज्यात आसरा घेतला. आता जवळपास महिन्याभरापासून तिकडे त्यांचं चित्रिकरण सुरू आहे. परराज्यापेक्षा महाराष्ट्रात चित्रिकरणासाठी लागणाऱ्या सुविधा अधिक आहेत. हे लक्षात घेता, मुंबई, पुणे, नाशिक आदी भागात चित्रिकरण करायला काहीच हरकत नाही असं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. मनसे चित्रपट सेनेने आयोजित केलेल्या झूम बैठकीत राज यांनी उपस्थितांचे सगळे मुद्दे ऐकून घेतले आणि ही बैठक संपता संपता आपलं हे मत मांडलं.

मनसे चित्रपटसेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या पुढाकाराने मनोरंजनक्षेत्रातल्या मान्यवरांची झूम बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज ठाकरे मार्गदर्शन करणार होते. मराठी चित्रपट, मालिका, नाटक या क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या ५० पेक्षा जास्त मान्यवरांनी या बैठकीत सहभाग घेतला. ही बैठक दीड तास चालली. या बैटकीत अनेक मुद्दे मांडले गेले. यात प्रामुख्याने आले ते चित्रिकरण सुरू करण्याचा मुद्दा. बायोबबल प्रणालीनुसार परराज्यात जर काम होतं तर महाराष्ट्रातही होऊ शकेल असं मत यावेळी मांडण्यात आलं. शिवाय, लोककलावंतांंना आर्थिक पॅकेज मिळावं, थिएटर्स मालकांची झालेली अवस्था, वाद्यवृंदाचे कलाकार, रंगमंच कामगार यांना अनुदान मिळावं, सध्या तयार असलेल्या चित्रपटांबद्दल काय करता येईल असे अनेक मुद्दे यावेळी मांडले गेले.

हे ही वाचा:

ममतांनीच जिल्हाधिकाऱ्यांना बोलू दिलं नाही

मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा म्हणजे दिखाऊपणा

डीएपीच्या भाववाढीला शरद पवार, मनमोहन सिंह जबाबदार

ठाकरे सरकारची ‘सोशल’ असहिष्णुता

राज ठाकरे यांनी शांतपणे सगळ्यांचे मुद्दे ऐकले आणि ते टिपूनही घेतले. यातल्या अनेक मुद्द्यांवर राज ठाकरे बोलले. काही मुद्दे आपण स्वत: मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू असं आश्वासन त्यांनी दिलंच, शिवाय पुढच्या दोन दिवसांत यावर कार्यवाही होईल असा विश्वासही दर्शवला. गरज पडली, तर आपण मुख्यमंत्र्यांसोबतही झूम बैठक करू असं यावेळी त्यांनी सांगितलं. या बैठकीला महेश मांजरेकर, केदार शिंदे, अंकुश चौधरी, लोकेश गुप्ते, सतीश राजवाडे, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, अमित फाळके, कौशल इनामदार, समित कक्कड, आदित्य सरपोतदार आदी मान्यवर उपस्थित होते.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा