32 C
Mumbai
Monday, June 21, 2021
घर राजकारण मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा म्हणजे दिखाऊपणा

मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा म्हणजे दिखाऊपणा

Related

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरचा कोकण दौरा म्हणजे केवळ दिखाऊपणा आहे. लिपस्टिक लावल्यावर सगळं कसं छान सुंदर आहे हे दाखवलं जातं आणि तोंड धुतल्यावर सगळं निघून जाते, तसा हा प्रकार असल्याची टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दौरा हा कोकणातील वस्तुस्थिती सरकारपुढे मांडण्यासाठी होता. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याने काहीही साध्य होणार नाही, असे नितेश राणे यांनी म्हटले.

ते गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन सर्व कारभार देवेंद्र फडणवीस यांच्या हातात द्यावा. मग आम्ही किती मदत आणून दाखवतो, ते बघा. एवढी हिंमत तुमच्यात आहे का? मनगटात हिम्मत असावी लागते. नुसता टोप घालून कुणी हिरो होत नाही. सरकारमध्ये वजन लागते. तुम्ही कॅबिनेट मंत्री आहात, मदत आणून दाखवा, असे नितेश राणे यांनी म्हटले.

गेल्या निसर्ग चक्रीवादळ तुलनेत प्रचंड नुकसान सिंधुदुर्गाचे झालेलं आहे. महाविकास आघाडी सरकारकडून अपेक्षा कशा ठेवणार ? मागचा अनुभव फार वाईट आहे. निसर्ग चक्रवादळाचे पैसे मिळाले नाहीत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काल मी माहिती घेतली ८ कोटी पैकीं फक्त ४९ लाख मिळाले. आज मुख्यमंत्री पंचनामे करण्याचे आदेश देतात मग ते पंचनामे रद्दी भरण्यासाठी ठेवले आहेत का ? अधिकारी पर्यटनासाठी गावागावात फिरतात का ? मुख्यमंत्री उद्या कोकणात येऊन काय दिवे लावणार आहेत, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.

या मुख्यमंत्र्यांकडून आमच्या जास्त अपेक्षा नाहीत. निसर्ग चक्रीवादळाचे पैसे मिळाले नाहीत तर आता काय देणार ते ? उद्याचा त्यांचा दौरा फोटोसेशनसाठी आहे. फोटोग्राफरने फोटो काढायचे असतात, स्वतःचे फोटो काढून घ्यायचे नसतात…जर ते फोटो काढून घेण्यासाठी येत असतील ते काम त्यांनी घरी बसूनच करावे…इथे यायची गरज काय ? इथे येतच असाल तर राज्याच्या जनतेच्या दिलसासाठी पॅकेज जाहीर करतात..निसर्ग चक्तीवादळाची, तौक्ते चक्रीवादळाची मदत द्या.

हे ही वाचा:

डीएपीच्या भाववाढीला शरद पवार, मनमोहन सिंह जबाबदार

ठाकरे सरकारची ‘सोशल’ असहिष्णुता

लसीचा एक डोसही वाया घालवू नका, मोदींनी दिला कानमंत्र

उद्धव ठाकरे घराबाहेर पडले तर ती ब्रेकिंग न्यूज असेल

आमचं केंद्रात सरकार आहे. आम्ही सर्व महिती सरकारला दिली आहे. आमचे मुख्यमंत्री कमी पडले असले तरी नरेंद्र मोदी साहेबांकडून भरपूर मदत मिळेल याचा विश्वास असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा