महाविकास भ्रष्टाचाराविरुद्ध आपण आवाज उठवत असल्यामुळे काही लोक आपल्यावर नाराज आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मुंबई पोलीस आयुक्तांना सांगून आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मला कळले आहे, अशा शब्दात आमदार अमित साटम यांनी भीती व्यक्त केली आहे.
ते म्हणाले, मी स्वतः मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून आलो असून एम.बी.ए. चे शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षणानंतर कॉर्पोरेट जगतातील माझ्या नोकरीचा त्याग करून देशसेवा करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टीचे काम मी सुरु केले. आपल्या आशीर्वादाने पहिल्यांदा नगरसेवक व नंतर आमदार म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. माझ्या मतदार संघात तसेच मुंबई शहरात आमुलाग्र बदल आणण्याकरिता मी सतत प्रयत्न करीत राहिलो.
गेल्या २ वर्षांपासून बृहन्मुंबई महापालिकेतला भ्रष्टाचार, महाविकास आघाडीचा भ्रष्टाचार व कोव्हीड काळामध्ये झालेला भ्रष्टाचार मी मोठ्या प्रमाणावर उघड केला आहे. मुंबई भारतीय जनता पार्टीच्या “पोलखोल” अभियानाचेही मी संयोजक म्हणून मी काम पहिले. माझ्या भ्रष्टाचारा विरुद्धच्या लढ्यामुळे काही लोक नाराज झाले आहेत. महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना मला फसविण्याचे खोट्या केसस मध्ये गोवण्याचे निर्देश दिलेले असल्याचे मला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. त्यामुळे अश्या कोणत्याही दबाव तंत्राला मी बळी पडणार नाही आहे. आपल्या आशीर्वादाने मी जनतेने मला दिलेल्या जवाबदारीचे पालन करीत राहीन व एक नवीन मुंबई घडविण्याकरीता झटत राहीन, असे पत्रक अमित साटम यांनी जाहीर केले आहे.
हे ही वाचा:
जवानांना घेऊन जाणारी बस नदीत पडली, ७ जवान मृत
समीर वानखेडे यांच्याविरोधात कठोर कारवाईचे आदेश
वीरप्पन गॅंग फुल फॉर्ममध्ये! मलनिस्सारण विभागात २१ हजार कोटींचा घोटाळा
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री चौटालांना चार वर्षांचा तुरुंगवास
दरम्यान, मुंबईमध्ये महापालिकेचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी भाजपाने पोलखोल अभियान सुरु केले आहे. या अभियानातंर्गत, भाजपा महापालिकेचा भ्रष्टाचार बाहेर काढत आहे. यामुळे महाविकास आघाडी आक्रमक झाली असून, पोलखोल अभियानाच्या रथाची,स्टेजची तोडफोड करत आहेत.