भारत सरकारने सिंधू जल करार (Indus Water Treaty) तात्पुरता निलंबित केल्यानंतर पाकिस्तानकडे जाणाऱ्या पश्चिमेकडील नद्या – झेलम, चिनाब आणि सिंधू – यांचे पाणी रोखून ते राजस्थानच्या श्रीगंगानगर भागापर्यंत आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामाला वेग दिला आहे.
या निर्णयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यप्रदेशातील पंचवटी येथे भाजपच्या तीन दिवसीय प्रशिक्षण वर्गात अधिकृत शिक्कामोर्तब केलं. “पुढील तीन वर्षांत सिंधूचे पाणी राजस्थानात ओढ्यांद्वारे पोहोचेल आणि त्यामुळे पाकिस्तानला थेंबा-थेंबासाठी हात पसरावे लागतील,” असे त्यांनी ठामपणे जाहीर केले.
सिंधू-चिनाब नहर प्रकल्पाचे प्राथमिक तपशील:
या प्रकल्पाअंतर्गत २०० किलोमीटर लांबीच्या ओढ्यांची उभारणी करण्यात येईल. त्याशिवाय, १२ भुयारी बोगद्यांची (टनेल्स) निर्मिती केली जाईल. तसेच सिंधू नदी खोऱ्यातील सर्व प्रकल्पांना गतीने मंजुरी देण्यात येणार असून सिंगल विंडो सिस्टिमद्वारे पर्यावरणविषयक मंजुरी जलद गतीने देण्याचे धोरण अवलंबिण्यात येईल. जलशक्ती मंत्रालयाकडून प्री-फिजिबिलिटी अभ्यास (पूर्व संभाव्यता परीक्षण) सुरू.
हे ही वाचा:
केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर पायलट्सचे परवाने निलंबित
दलितांचा अपमान करणे हा राजद व काँग्रेसचा नैतिक अधिकार
ट्रंप यांनी इराणला काय दिला इशारा ?
भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल
हा निर्णय केवळ सिंचन प्रकल्प नाही, तर तो राजकीयदृष्ट्या पाकिस्तानवर दबाव टाकण्याच्या प्रयत्नाचा भाग मानला जात आहे. १९६० मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या सिंधू जल करारानुसार भारत पूर्वेकडील नद्या वापरत होता आणि पश्चिमेकडील नद्यांचे पाणी पाकिस्तानकडे जात होते. मात्र, आता या करारावर भारताने प्रश्नचिन्ह उपस्थित करून आपले पाणी आपण वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
याचे अपेक्षित परिणाम
या निर्णयामुळे –
-
राजस्थानमध्ये शेतीसाठी अधिक पाणी उपलब्ध
-
श्रीगंगानगर, हनुमानगड इत्यादी भागांत सिंचन सुविधा वाढणार
-
पाकिस्तानच्या जलस्रोतांवर दबाव
-
जल संरक्षण व राष्ट्रहिताच्या दृष्टीने मोठे पाऊल
