27 C
Mumbai
Thursday, December 9, 2021
घरराजकारणज्यांना भ्रष्ट ठरवलं ते मलिकच भ्रष्टाचाराची व्याख्या करत आहेत!

ज्यांना भ्रष्ट ठरवलं ते मलिकच भ्रष्टाचाराची व्याख्या करत आहेत!

Related

आशीष शेलार यांनी उडविली नवाब मलिकांची खिल्ली

भ्रष्टाचाराची नवी व्याख्या मलिकांनी केली. जी हास्यास्पद होती. पीबी सावंत यांनी जो रिपोर्ट सरकारला दिला तो तत्कालिन राज्य सरकारने स्वीकारलाही. ज्या अहवालात मलिक यांना भ्रष्ट ठरवलं ते मलिक भ्रष्टाचाराची व्याख्या करत आहेत अशा शब्दांत नवाब मलिक यांनी खिल्ली उडवत भाजपा नेते ऍड. आशीष शेलार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, देणारा आणि घेणारा दोघांच्या संगनमताने भ्रष्टाचार होतो. मलिक यांनी नवी व्याख्या घोषित केली. तुम्ही पीडित आहात तर भ्रष्टाचारी नाहीत. सावंत यांनी तुम्हालाच भ्रष्ट घोषित केलं आहे. तेव्हा मानसिक संतुलन ठेवा.

शाहरुख खानने आपल्या मुलासाठी पैसे देण्याची तयारी दर्शविल्याची चर्चा असताना तो पीडित असल्यामुळे त्याला असे करावे लागल्याचे मलिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आणि पीडित भ्रष्ट नसतो, असाही दावा केला. त्यावरून शेलार यांनी मलिक यांच्यावर टीका केली.

 

हे ही वाचा:

वरळी कोळीवाडा डेपो बंद; प्रवासी संभ्रमात

हायड्रोजन सोडा, मलिकांना ऑक्सिजनची गरज!

सदाभाऊ खोतांना मानखुर्द जवळ रोखले

‘मराठी एसटी कर्मचाऱ्यांबद्दल ठाकरे सरकारला आपुलकी नाही’, गोपीचंद पडळकर यांचा हल्लाबोल

 

रियाझ भाटीचे फडणवीस यांच्यासह फोटो दाखवून मलिक यांनी खळबळ उडविण्याचा प्रयत्न केला पण फोटोवरूनच संबंध दाखवायचे असतील तर हे फोटो दाखवतो असे म्हणत शेलार यांनी रियाझ भाटीचे आदित्य ठाकरे, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरेंसोबत, अस्लम शेख यांच्यासोबतचे फोटो दाखविले. ते म्हणाले की, फोटो दाखविण्याचा धंदा करू नका. मलिकांबद्दल चिंता वाटू लागली आहे. त्यांचं मानसिक संतुलन बिघडले आहे की काय असे वाटते कदाचित हर्बल तंबाखूचा सप्लाय बंद पडला आहे की काय? जावयाचे म्हणणे खरे करण्यासाठी नीच पातळीवर जाऊ नका. नवाबी पातळी असे म्हणता येईल त्याला, असेही शेलार म्हणाले.

जेलमध्ये असलेल्या सरदार शहा वलीशी करार कसा केला?

 

शेलार यांनी सवाल उपस्थित केला की, सरदार शहा वली खान, १९९३च्या बॉम्बस्फोटातील शिक्षापात्र गुन्हेगार आहे. ज्याची जन्मठेप कायम झाली आहे. तो सरदार शहावली खान ९३पासून अजून जेलमध्ये आहे. मलिकांना सवाल आहे. जो जेलमध्ये आहे त्याच्याशी २००५मध्ये तुम्ही व्यवहार कसा केला. तुम्ही विशेष परवानगी घेतलीत की तुम्ही परवानगी घेऊन त्याला बाहेर काढले. त्याची आणि प्लंबर या महिलेची भेट करून दिलीत की जेलमधून बाहेर काढून भेट केलीत. जो आरोपी ९३पासून जेलमध्ये आहे त्याच्याशी व्यवहार कसा केला त्याचे हस्ताक्षर घेऊन.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,516अनुयायीअनुकरण करा
4,940सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा