32 C
Mumbai
Monday, November 28, 2022
घरराजकारणमराठी-मुस्लिम समर्थन ही मतांसाठी राजकीय पेरणीच!

मराठी-मुस्लिम समर्थन ही मतांसाठी राजकीय पेरणीच!

आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप

Google News Follow

Related

स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी मतांची राजकीय पेरणी करण्याचा एक नवीन विचार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून हळुवारपणे मांडला जात आहे असा गंभीर आरोप मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. मुंबई भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सामनामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मराठी -मुस्लिम यांचे समर्थन अशा आशयाची बातमी झळकली आहे. कोणी कोणाला समर्थन द्यावे हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. पण नीट बघितलं तर यामध्ये स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी मतांची पेरणी करण्याचा एक नवीन विचार हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने हळुवारपणे मांडले आहे. या समर्थनामध्ये स्वार्थाच्या लांगूलचालनाचा वास आहे. ही नॅरेटिव्ह सेट करण्याची आणि येणारी मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी केलेली राजकीय मतांची पेरणी आहे, अशी टीकाही शेलार यांनी यावेळी केली. खरं म्हणायचं होतं मराठी आणि मुस्लिम थेट म्हणण्याची हिंमत नसल्यानं हा शब्द वापरला असेही शेलार म्हणाले.

हे ही वाचा:

सावधान! सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सबाबत केंद्राचे नवे नियम

कॉमेडियन भारती सिंगविरोधात ड्रग्ज प्रकरणी आरोपपत्र दाखल

मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ

बिहारमध्ये गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट, सात पोलिसांसह ३० जखमी

नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम त्यांच्या पक्षातील काही लोकांनी सुरु केलं आहे. त्यांच्या आजी-माजी संपादकांनी केलेल्या कार्यक्रमात हेच नॅरेटिव्ह चालवण्यात आले. हे सर्व प्रयत्न मराठी मतांना भुलवणे आणि मुस्लिम मतांना फसवण्याचा आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेनं जातीपातीच्या पलीकडे राजकारण करून मतांची आखणी व बांधणी केली होती. आज तुम्हाला जाती धर्मावर मते मागण्याची वेळ का आली. ही पेरणी करण्याची गरज का पडली असा सवालही शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,952चाहतेआवड दर्शवा
1,975अनुयायीअनुकरण करा
52,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा