30 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
घरदेश दुनियाकेदारनाथमध्ये घोडे, खेचर करून देतात १०० कोटींची कमाई

केदारनाथमध्ये घोडे, खेचर करून देतात १०० कोटींची कमाई

चारधाम यात्रेने तोडले कमाईचे विक्रम

Google News Follow

Related

केदारनाथ धाम हे उत्तराखंडमधील चार धाम यात्रेचे सर्वात मोठे आकर्षण आहे. दरवर्षी प्रवासी संख्येत विक्रमी वाढ होत आहे. त्यामुळेच यंदाच्या वर्षात केदारनाथ यात्रेत फक्त घोडे-खेचर आणि डोली या माध्यमातूनच तब्बल १०१.३४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळालेलं आहे. विशेष म्हणजे हेलिकॉप्टर सेवा देणाऱ्या कंपन्यांनी देखील ७५.४० कोटी रुपयांची कमी केली आहे.

चार धामांपैकी गंगोत्री आणि बद्रीनाथ धाम तुम्ही सहज पोहचू शकता. पण केदारनाथ आणि यमुनोत्री धामला जाण्यासाठी अनेक किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. सरकारी आकडेवारीनुसार केदारनाथ धाममध्ये घोडे-खेचर आणि डोली व्यावसायिकांनी सुमारे १०१.३४ कोटी रुपयांचा विक्रमी व्यवसाय केला, ज्यातून सरकारला ८ कोटी रुपयांहून अधिक महसूलही मिळाला.

यात्रेकरूंच्या प्रवासात सुसूत्रता आणण्यासाठी या वेळी ८,६६४ घोडे व खेचरांची ४,३०२ घोडेमालकांची प्रशासनाने नोंदणी केली. या हंगामात ५.३४ लाख यात्रेकरू घोडे व खेचरांवर स्वार होऊन केदारनाथ धामला पोहोचले. दुसरीकडे यमुनोत्रीमध्ये घोडे आणि खेचरांनी २१.७५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आणि हा आकडाही नवा विक्रम आहे. यमुनोत्री धाममध्ये सुमारे २,९०० घोडे आणि खेचरांची नोंदणी झाली. त्याचवेळी हेलिकॉप्टर सेवा देणाऱ्या कंपन्यांनीही ७५.४० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

हे ही वाचा:

सावधान! सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सबाबत केंद्राचे नवे नियम

कॉमेडियन भारती सिंगविरोधात ड्रग्ज प्रकरणी आरोपपत्र दाखल

मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ

बिहारमध्ये गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट, सात पोलिसांसह ३० जखमी

यात्रेकरूंच्या संख्येचाही विक्रम

कोविड कालावधीमुळे दोन वर्षे बंद होते. त्यामुळे यावर्षी चारधाम यात्रेने यात्रेकरूंच्या संख्येचा विक्रमही केला आहे. ही सर्वात मोठी आकडेवारी आहे. केदारनाथमध्ये १५,६१,८८२ तर ४ लाख ८६ हजार भाविकांनी यमुनोत्री मंदिरात दर्शन घेतले आहे. चार धाम यात्रा उत्तराखंडमध्ये शेवटच्या टप्प्यावर आहे. गुरुवारी बाबा केदारनाथ आणि यमुनोत्रीचे दरवाजे हिवाळ्यासाठी बंद करण्यात आले . बुधवारी गंगोत्रीचे दरवाजे बंद करण्यात आले होते, तर बद्रीनाथचे दरवाजे १९ नोव्हेंबरला बंद होतील.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा