28 C
Mumbai
Sunday, November 27, 2022
घरराजकारणगुजरात निवडणुकीची घोषणा १ नोव्हेंबरला होणार

गुजरात निवडणुकीची घोषणा १ नोव्हेंबरला होणार

दोन टप्प्यात होणार मतदान

Google News Follow

Related

आता प्रत्येक राजकीय पक्ष गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची वाट पाहत आहेत. निवडणूक आयोगाच्या सूत्रांवर विश्वास ठेवला तर निवडणुकीच्या तारखा १ नोव्हेंबरला जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तारखा जाहीर होताच गुजरातमध्ये आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान १ ते २ डिसेंबर आणि दुसऱ्या टप्प्यात ४ ते ५ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे८ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

हिमाचल प्रदेश आणि गुजरात निवडणुकांच्या तारखा जाहीर न केल्याबद्दल नुकतेच विरोधकांनी केंद्र सरकार आणि आयोगावर प्रश्न उपस्थित केले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ऑक्टोबरला गुजरात दौऱ्यावर आहेत. सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त, राष्ट्रीय एकता दिनानिमित्त स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व राज्यांच्या एकटा पोलिस परेडमध्ये ते सहभागी होतील.याशिवाय पंतप्रधान जांबुघोडा येथील आदिवासींना संबोधित करणार आहेत. यासोबतच बनासकांठामध्ये उत्तर गुजरातला दिल्या जाणाऱ्या पाणी योजनेचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत.

गुजरात विधानसभेच्या एकूण १८२ जागा आहेत. यावेळी भाजप आणि काँग्रेसशिवाय ‘आप’ही रिंगणात आहे. त्यामुळे येथे रंजक तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीबद्दल बोलायचे झाल्यास, भाजपने ९९ जागा जिंकून पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केले होते, तर काँग्रेसने ७७ जागा जिंकल्या होत्या.राज्य विधानसभेची मुदत १८ फेब्रुवारी २०२३ रोजी संपत आहे, त्यामुळे त्यापूर्वी तेथील निवडणुकांचे निकाल जाहीर केले जातील.

हे ही वाचा:

सावधान! सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सबाबत केंद्राचे नवे नियम

कॉमेडियन भारती सिंगविरोधात ड्रग्ज प्रकरणी आरोपपत्र दाखल

मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ

बिहारमध्ये गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट, सात पोलिसांसह ३० जखमी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर रोजी निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच गुजरातमध्ये आदर्श आचारसंहिता लागू होईल. त्यानंतर गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान १ ते २ डिसेंबर आणि दुसऱ्या टप्प्यात ४ ते ५ डिसेंबर रोजी मतदान होणार असून निकाल ८ डिसेंबरला जाहीर होणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,951चाहतेआवड दर्शवा
1,977अनुयायीअनुकरण करा
52,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा