29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरविशेषलोकहो! रविवारी ३० ऑक्टोबरला तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

लोकहो! रविवारी ३० ऑक्टोबरला तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

तिन्ही मार्गावर 'मेगाब्लॉक'

Google News Follow

Related

मुंबईची ‘जीवन वाहिनी’ म्हणून ओलखल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकलच्या मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या रविवार ३० ऑक्टोबर रोजी मेगाब्लॉक असणार आहेत. मात्र या प्रवाशांनी रेल्वे लोकलचे वेळापत्रक पाहून बाहेर पडावे, तसेच उद्या नियोजित स्थळी पोहोचण्यासाठी प्रवाशांना अतिरिक्त वेळ लागण्याची शक्यता असून, प्रवासासाठी जास्तीचा वेळ शिल्लक ठेवावा.

उद्या मेगाब्लॉक उपनगरीय रेल्वे मार्गावरील मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप अँड डाउन जलद मार्गावर तर हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी डाउन मार्गावर तसेच पश्चिम मार्गावरील गोरेगांव ते सांताक्रूझ दरम्यान धीम्या आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामध्ये उपनगरीय रेल्वे मार्गावरील सिग्नल यंत्रणेतील दुरुस्ती तसेच, रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

नियोजित मेगाब्लॉक हा मध्य रेल्वे मार्गातील माटुंगा ते मुलुंड अप अँड डाउन जलद मार्गावर सकाळी ११:०५ ते दुपारी ०३:५५ वाजेपर्यत असणार आहे. लोकल गंतव्यस्थानी नियोजित वेळच्या १५ ते २० मिनिटे उशिरा पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच दोन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक सेवा धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. तसेच सीएसएमटी हून कल्याण कल्याण, कसारा आणि खोपोली या मार्गावरील सर्व लोकल विलंबाने धावतील.

पश्चिम मार्गावरील गोरेगांव ते सांताक्रूझ दरम्यान धीम्या आणि डाऊन जलद मार्गावर मध्यरात्री १२:२५ ते पहाटे ०४:२५ वाजेपर्यत मेगाब्लॉक असणार आहे. तसेच या मार्गवारील सर्व डाउन दिशेच्या सर्व जलद गाड्या गोरेगाव ते सांताक्रूझ दरम्यान डाउन धीम्या मार्गावर धावतील. तसेच सर्व लोकल गाड्याना विलेपार्ले स्थानकावर दुहेरी थांबा दिला जाणार आहे.

हे ही वाचा:

सावधान! सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सबाबत केंद्राचे नवे नियम

कॉमेडियन भारती सिंगविरोधात ड्रग्ज प्रकरणी आरोपपत्र दाखल

मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ

बिहारमध्ये गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट, सात पोलिसांसह ३० जखमी

हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक सकाळी ११:१० ते सायंकाळी ०४:१० वाजेपर्यंत असणार आहे. मेगाब्लॉक कालावधीमध्ये सर्व लोकल फेऱ्या रद्द करण्यात आले आहेत तर सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल मार्गादरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहे. प्रवाशांनी नियोजित वेळापत्रक पाहून आपला प्रवास करावा.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा