26 C
Mumbai
Thursday, July 18, 2024
घरराजकारणआदित्य ठाकरेंच्या पायाखालची वरळीची जमीन सरकणार?

आदित्य ठाकरेंच्या पायाखालची वरळीची जमीन सरकणार?

लोकसभेच्या निकालानंतर भाजपाकडून वरळीत बॅनरबाजी

Google News Follow

Related

लोकसभा निवडणूकीत महायुतीला राज्यात अपेक्षित जागांपेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. महाविकास आघाडीने महायुतीपेक्षा जास्त जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे आता विधानसभेत मात्र महायुती आघाडी नव्या ताकदीने निवडणुकीसाठी मैदानात उतरणार असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत जरी महाविकास आघाडीने बाजी मारली असली तरी ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या वरळीत मात्र विधानसभेची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.

सध्या वरळी हा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. वरळी मतदारसंघ दक्षिण मुंबईत येतो, जिथून ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांनी लोकसभा निवडणूक जिंकली. दक्षिण मुंबईत ठाकरे गटाचे अरविंद सावंत विरुद्ध शिंदे गटाच्या यामिनी जाधव असा सामना होता. अरविंद सावंत मागच्या दोन टर्मपासून खासदार आहेत. यामिनी जाधव भायखळ्यातून आमदार आहेत. पण वरळीतून त्यांना फार मोठ मताधिक्क्य मिळालं नाही. त्यामुळे विधानसभेत ठाकरे गटाला वरळीमधून जबरदस्त टक्कर मिळणार असल्याचे गणित आहे.

लोकसभेच्या निकालानंतर भाजपाने वरळीत बॅनरबाजी सुरु केली आहे. भाजपाने मतदारांचे आभार मानणारे बॅनर लावले आहेत. वरळीमधून यंदा महाविकास आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत यांना ६४ हजार मतं पडली, तर महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांना ५८ हजार मतं मिळाली. अरविंद सावंत यांना वरळीतून फक्त ६ हजार ७१५ मतांनी लीड मिळाली. काही महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा विचार करताना ठाकरे गटाला ही चिंतेत टाकणारी बाब आहे. शिवाय भाजपा आणि महायुतीला अनपेक्षित अपयशाचा सामना करावा लागल्याने त्यांनी विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे.

हे ही वाचा:

रोहित, हार्दिकच्या खेळीमुळे आयर्लंडवर सफाईदार विजय!

‘हिंदुत्ववादी मतदारांवर लक्ष केंद्रित करा, डाव्या विचारसरणीला धक्का देणाऱ्या नव-हिंदुत्ववादींपासून अंतर ठेवा’

एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार

युगांडाच्या ४३ वर्षीय गोलंदाजाने रचला इतिहास

वरळीत भाजपाने जे बॅनर लावलेत, त्यावर लोकसभेची कसर विधानसभेला भरुन काढू असं लिहित स्पष्ट इशारा ठाकरे गटाला दिला आहे. या बॅनरवरुन भाजपा महाराष्ट्रसह वरळीचा गड सर करण्यासाठी पूर्ण ताकदीने उतरणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे येथे आदित्य ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
165,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा