30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरराजकारणप्रशांत किशोर म्हणतात, पुढील अनेक दशके भाजपाच

प्रशांत किशोर म्हणतात, पुढील अनेक दशके भाजपाच

Google News Follow

Related

भारतीय जनता पक्ष (भाजप) पुढील अनेक दशकांपर्यंत भारतीय राजकारणात एक प्रमुख शक्ती राहील, असे राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी गोवा भेटीदरम्यान सांगितले. एक निवडणूक सल्लागार कंपनी, IPACचे प्रमुख, प्रशांत किशोर यांनी सांगितले की भाजपला हरवण्यासाठी ‘अनेक दशके’ लढावे लागेल.

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस (TMC) ला या वर्षाच्या सुरुवातीला सत्ता टिकवून ठेवण्यास मदत केल्यावर किशोरची निवडणूक रणनीतीकार म्हणून ओळख पुन्हा एकदा नावारूपाला आली.

प्रशांत किशोर आता गोव्यात आहेत, ते निवडणूक लढवण्यासाठी टीएमसीला मदत करत आहेत. आगामी दशकांमध्ये भाजपाच्या मजबूत उपस्थितीचे भाकीत करताना, किशोर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आणि ते म्हणाले की मोदींची सत्ता गेल्यावर आपल्यालाच मिळणार आहे या भ्रमात ते आहेत.

“भाजपा पुढील अनेक दशके भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी असणार आहे, मग ते जिंकत किंवा हरवत. जसे काँग्रेससाठी पहिली ४० वर्षे होती (१९५२-१९९२). भाजपा कुठेही जात नाही. एकदा तुम्ही राष्ट्रीय पातळीवर ३०% मते मिळवली की, तुम्ही सहजासहजी जात नाही.” असं प्रशांत किशोर म्हणाले.

“म्हणून लोक रागावतील आणि मोदींना हाकलून देतील अशा भ्रमात राहू नका. कदाचित लोकं मोदींना हरवतील, पण भाजपा कुठेच जात नाही. तुम्हाला पुढील अनेक दशके यासाठी संघर्ष करावा लागेल,” असे गोव्याच्या संग्रहालयात आयोजित केलेल्या संवादात ते म्हणाले.

हे ही वाचा:

आजारी सचिन वाझे चांदीवाल आयोगापुढे गैरहजर

अमरिंदर सिंग-अमित शहा भेटीत युतीची चर्चा?

‘बुलढाणा अर्बन’ ची आयकर विभागामार्फत चौकशी

“…आपली बहिण”, क्रांति रेडकरांचे मुख्यमंत्र्यांना खुले पत्र

“जोपर्यंत तुम्ही त्यांची (मोदींची) ताकद तपासत नाही, समजून घेत नाही आणि ओळखत नाही, तोपर्यंत तुम्ही त्यांचा पराभव करण्यासाठी तयार होऊ शकत नाही.” प्रशांत किशोर म्हणाले. “मला दिसत असलेली समस्या ही आहे की बहुतेक लोकं त्यांची ताकद समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ घालवत नाहीत. तुम्हाला ते माहीत असेल तरच तुम्ही वेगळा पर्याय शोधू शकता.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा