25 C
Mumbai
Saturday, December 2, 2023
घरराजकारणसुप्रियाताई, विद्यार्थ्यांची दिशाभूल करू नका, वास्तव समजून घ्या!

सुप्रियाताई, विद्यार्थ्यांची दिशाभूल करू नका, वास्तव समजून घ्या!

महाराष्ट्र भाजपाचा तहसिलदार जाहिरातीवरून इशारा

Google News Follow

Related

जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसिलदारपदासाठी दिलेल्या जाहिरातीवरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केल्यानंतर त्याला महाराष्ट्र भाजपाने सडेतोड उत्तर दिले आहे.

 

 

भाजपाला या महाराष्ट्राचं नेमकं काय करायचंय? आता तहसीलदार देखील कंत्राटी नेमण्याचा घाट या सरकारनं घातला आहे. खरंतर या सरकारने मुख्यमंत्री,हवे तेवढे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि अख्खं मंत्रीमंडळ कंत्राटी पद्धतीने चालवायला द्यावं. उपहासाचा भाग सोडला तर हे सरकार असे असंवेदनशील निर्णय का घेतंय याचे आश्चर्य वाटते, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी एक्सवर मेसेज शेअर करत केली होती. त्यावर मग महाराष्ट्र भाजपाने उत्तर दिले.

 

 

 

कंत्राटी पद्धतीने तहसिलदारांची भर्ती केली जात असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला होता. त्यावर भाजपाने म्हटले आहे की, ताई, विद्यार्थ्याना हाताशी धरून राजकारण करू नका.. आम्ही खोलात गेलो तर अवघड जाईल.. परत राजकीय द्वेष म्हणून रडू नका.. कंत्राटी भरतीची संबंधित जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही तुमच्यासारख्या राजकीय लोकप्रतिनिधिनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देणे चालू केले आहे. जेंव्हा तुम्ही सत्तेत होते तेव्हा काळ्या यादीत असणाऱ्या कंपन्यांना नोकरभरतीचे कॉन्ट्रॅक्ट देऊन परीक्षा घेतल्या होत्या. सुप्रियाताई याबद्दल तुम्हाला चांगलीच माहिती आहे. प्रितेश देशमुख, न्यासा कम्युनीकेशन याबद्दल आम्ही तोंड उघडले तर ताई, तुम्हाला (पक्षाला) अवघड होईल. कारण, तुमच्या काळात प्रितेश देशमुखने (जामिनावर बाहेर आहे). न्यासाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेत भ्रष्टाचार तर झाला होता म्हणून, तुमच्या तत्कालिन सरकारला भरतीही रद्द करावी लागलेली होती. त्यामुळे, ताई आपण विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यापेक्षा फॅक्ट समजून घेऊन ट्विट करायला हवे होते.

हे ही वाचा:

अमेरिकेमध्ये १ ऑक्टोबरपासून शटडाऊनचे संकट

ईदच्या जुलूसमधील टवाळखोरांकडून महिला पोलीस कॉन्स्टेबलची छेड, विक्रोळीत तणाव

विसर्जन सोहळ्यादरम्यान हरवलेल्या २२ मुलांना पालकांकडे सोपवले!

आशियाई स्पर्धेत टेनिसमध्ये भारताला सुवर्ण

 

यात पुढे म्हटले आहे की, तुम्हाला जर राजकारणचं करायचे असेल तर आमचं खुलं आवाहन आहे. विद्यार्थी हितासाठी तुम्हाला जशास तसे 24×7 उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत. सुप्रियाताई नेमकी कंत्राटी भरती आपण समजूनच घेतली नाही, म्हणून थोडीशी माहिती तुमच्यासाठी देत आहोत तुमच्या माहितीत तेवढीच भर पडेल.

 

 

सर्वप्रथम जळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेलं स्पष्टीकरण पहा.. “मला मदत करण्यासाठी, माझे कोर्ट-कचेरीच्या कामांना सहकार्य करण्यासाठी, माझे प्रश्न समजून घेण्यासाठी, ऑर्डरची ड्राफ्टिंग करण्यासाठी आपण नायब तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी जाहिरात काढली आहे. असे अनेक नियुक्त्या हंगामी करू शकतात तीन महिन्यासाठी, सहा महिन्यांसाठी.. सुप्रियाताई मुळात ही भरती कायमस्वरूपी नाही. शिवाय MPSC च्या कोणत्याही जागा कमी किंवा रद्द करून ही भरती करण्यात येत नाही ही बाब तुम्ही लक्षात घेणे गरजेचे आहे. काही तत्काळ कामासाठी तातडीने अधिकाऱ्यांची गरज आहे आणि एवढ्या कमी वेळेत आवश्यक ते अधिकारी मिळणे अशक्य आहे. त्यामुळे कामे लवकर होण्यासाठी ही तत्काळ भरती होत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
110,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा