30.3 C
Mumbai
Tuesday, May 12, 2026
घरराजकारणमहुआ मोइत्रा यांच्यासमोर विमानात ‘चोर चोर, टीएमसी चोर’च्या घोषणा

महुआ मोइत्रा यांच्यासमोर विमानात ‘चोर चोर, टीएमसी चोर’च्या घोषणा

व्हिडीओ शेअर करत केली कारवाईची मागणी

Google News Follow

Related

पश्चिम बंगालमध्ये भाजपने विधानसभा निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसचा पराभव करत मोठा विजय मिळवला आहे. यानंतर तृणमूल नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर टीका करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदार महुआ मोईत्रा यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून हा व्हिडीओ विमानातील आहे. ज्यात काही लोक ‘चोर चोर, टीएमसी चोर’ आणि ‘जय श्री राम’ अशा घोषणा देत आहेत. यानंतर त्यांनी संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.

महुआ मोईत्रा यांनी विमानात त्यांचा छळ झाल्याचा आरोप केला आहे. ही घटना गुरुवारी (७ मे) दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात घडली. मोईत्रा यांच्या म्हणण्यानुसार, त्या संरक्षणविषयक संसदीय स्थायी समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी अधिकृत कामानिमित्त दिल्लीत जाण्यासाठी प्रवास करत होत्या. टीएमसी नेत्यांनी दावा केला आहे की, पुरुष प्रवाशांच्या एका गटाने विमानात ‘चोर चोर, टीएमसी चोर’ आणि ‘जय श्री राम’ अशा घोषणा दिल्या आणि त्यांचे चित्रीकरण केले. मोईत्रा यांनी एअरलाइन आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री, किंजरपू राममोहन नायडू यांनी तात्काळ दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

मोईत्रा या इंडिगो फ्लाइट 6E 719 मध्ये 1F सीटवर बसल्या होत्या, तेव्हा चार ते सहा पुरुषांचा एक गट विमानात चढला आणि त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहू लागले. त्यांच्या म्हणण्यानुसार, विमान उतरल्यावर आणि दरवाजे उघडण्यापूर्वी, पुरुषांच्या त्या गटाने त्यांच्या परवानगीशिवाय विमानाच्या आत व्हिडिओ रेकॉर्ड करत घोषणाबाजी सुरू केली. महुआ मोईत्रा यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, पुरुषांचा एक गट “जय श्री राम” आणि “चोर चोर टीएमसी चोर” (टीएमसी चोरांचा पक्ष आहे) अशा घोषणा देताना ऐकू येतो. त्यानंतर मोइत्रा यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे की “हा नागरिकांचा राग नाही. हा छळ आहे आणि विमानामधील माझ्या सुरक्षेचा भंग आहे. विमानात असा छळ करून हे गुंड कोणत्याही परिस्थितीत सुटू शकत नाहीत.”

हे ही वाचा:

ट्रम्प यांनी लादलेले १०% जागतिक शुल्क बेकायदेशीर

होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका- इराणमध्ये गोळीबार

कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी आरोपी निदा खान सापडली!

राहुल गांधी बेहिशेबी मालमत्ता प्रकरण

एक्सवरील आणखी एका पोस्टमध्ये मोईत्रा यांनी भाजपवर जोरदार टीका केली. “ही भाजपची संस्कृती आहे. यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? मी त्याकडे दुर्लक्ष करून विमानतळावरून माझ्या मीटिंगला गेले. मग लोकांनी मला एक व्हिडिओ फॉरवर्ड केला, जो संघी ‘व्हायरल’ करत होते. तेव्हाच मी हा प्रकार उघडकीस आणला. इंडिगो मला सांगत आहे की त्यांना औपचारिक तक्रार हवी आहे. जी मी पाठवत आहे.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
306,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा