29 C
Mumbai
Thursday, August 18, 2022
घरराजकारणशिवसेना वाचविण्यासाठी शहीद झालो तरी चालेल पण आता माघार नाही!

शिवसेना वाचविण्यासाठी शहीद झालो तरी चालेल पण आता माघार नाही!

Related

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला घणाघात

राज्यात आलेल्या शिंदे- फडणवीस सरकारने विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक जिंकल्यानंतर आता विश्वासदर्शक ठरावही १६४ मतांनी जिंकला आहे. यानंतर भाषणादरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण करताना सणसणीत टीका केली.

एकनाथ शिंदे यांनी बंड का केलं? याचं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. विधान परिषद निवडणुकीत मिळालेल्या वागणुकीमुळे अस्वस्थ होतो. माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला, अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली.

शिवसेना भाजप युतींचे सरकार स्थापन झाले. गेले पंधरा दिवस, शिवसेनेचे चाळीस आमदार आणि अपक्ष दहा असे पन्नास आमदार माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यासोबत राहिले. त्यांचे मी धन्यवाद देतो. मला विश्वास बसत नाही मी सभागृहात मुख्यमंत्री म्हणून बोलतोय, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

राज्यात अडीच वर्ष आम्ही सरकारमध्ये होतो. आम्हाला फार चांगले अनुभव आले नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी फारसं बोलता येत नव्हतं. आता शिवसेना वाचवण्यासाठी शहीद झालो तरी चालेल पण आता माघार घेणार नाही. मी शिवसेनेला आपलं कुटुंब मानलं. शिवसेनेला वेळ दिला आणि आयुष्य खर्ची केलं, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

हे ही वाचा:

अशोक चव्हाण, वडेट्टीवार बहुमत चाचणीला पोहोचलेच नाहीत!

शिंदे फडणवीस सरकारने बहुमत चाचणी १६४ मतांनी जिंकली

कर्नाटकची सिनी शेट्टी बनली ‘मिस इंडिया २०२२’

डेन्मार्कमधील मॉलमध्ये गोळीबार; तिघांचा मृत्यू

आम्ही तिकडे असताना आमचा बाप काढला गेला, कुणी आम्हाला रेडे म्हणाले, कुणी प्रेतं म्हणाले. आमच्यावर गद्दारीचा शिक्का मारण्यात आला, आम्ही गद्दार नाही. न्यायासाठी बंड करायला बाळासाहेबांनी शिकवलं आणि आम्ही तेच केलं. कामाख्या देवीला ४० रेडे पाठवले असं कुणीतरी म्हटलं होतं, पण देवीनं म्हटलं की तो बोलणारा रेडा आम्हाला नको, असा सणसणीत टोला एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता संजय राऊतांना लगावला आहे.

आमची नैसर्गिक युती ही भाजपसोबत आहे, उद्धव ठाकरेंना हे सांगण्याचा मी पाच वेळा प्रयत्न केला. बाळासाहेबांच्या आणि आनंद दिघे साहेबांच्या विचारांचे आम्ही शिवसैनिक आहोत. हिंदुत्वाचा विरोध करणाऱ्यांच्या सोबत सत्तेत कसं बसायचं असा असा सवाल आमदारांनी केला आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,912चाहतेआवड दर्शवा
1,918अनुयायीअनुकरण करा
23,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा