काँग्रेस स्वतःला एक लोकशाही पक्ष मानते, जिथे अंतर्गत चर्चा स्वागतार्ह आहे, परंतु पक्षाचे खासदार शशी थरूर यांनी भारत-पाकिस्तान संघर्षावर दिलेल्या अलीकडील विधानांमुळे “लक्ष्मण रेषा ओलांडली,” असे एका काँग्रेस नेत्याने म्हटले आहे. थरूर यांनी केलेली विधाने ही सरकारच्या समर्थनार्थ असल्याचा दावा करत काँग्रेसने त्यांच्या विधनांबदल नाराजी व्यक्त केली आहे.
थरूर यांनी “ऑपरेशन सिंदूर” बाबत सरकारचे कौतुक करत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांना “संयमित” आणि “अतिशय विचारपूर्वक” असे म्हटले होते. ट्रम्प यांचे भारत-पाकिस्तानमधील मध्यस्थीबाबतचे दावे त्यांनी जोरदारपणे फेटाळले होते.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी थरूर यांना थेट विचारले की, ते पक्षाच्या अधिकृत भूमिकेपासून दूर का गेले.
“पक्षात पुरेशी लोकशाही आहे आणि प्रत्येकाला आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे, परंतु थरूर यांनी यावेळी लक्ष्मण रेषा ओलांडली,” असे एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
एका सूत्राने सांगितले की, थरूर यांनी आपली भूमिका समजावून सांगताना १९ मे रोजी होणाऱ्या संसदीय स्थायी समितीच्या परराष्ट्र विषयक बैठकीकडे लक्ष वेधले, ज्यामध्ये परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांना बोलावण्यात आले आहे.
पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले की बैठकीत एक “स्पष्ट संदेश” देण्यात आला – सध्याची स्थिती वैयक्तिक मतांसाठी महत्वाची नसून पक्षाच्या भूमिकेला प्राधान्य देण्याची आहे.
नंतर, पत्रकार परिषदेत थरूर यांच्या मतांबाबत पक्ष अनुकूल आहे का, असे विचारले असता काँग्रेसने स्वतःला त्यापासून दूर ठेवले. “शशी थरूर काय म्हणतात ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. ते स्वतःसाठी बोलतात, काँग्रेस पक्षासाठी नाही,” असे जयराम रमेश म्हणाले.
थरूर काय म्हणाले होते?
सोमवारी थरूर यांनी ट्रम्प यांच्या भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव कमी केल्याच्या दाव्यावर टीका केली आणि तो दावा “भारतासाठी निराशाजनक” असल्याचे म्हटले.
ते म्हणाले की, ट्रम्प यांचा दावा “पाकिस्तानला वाटाघाटी करण्याची मुभा देतो, जी त्यांना मिळालेली नाही आणि स्पष्टपणे सांगितले, “भारत कधीही आपल्या डोक्यावर बंदुकीची नळी ठेवणाऱ्या दहशतवाद्यांशी वाटाघाटी करणार नाही.”
हे ही वाचा:
“युद्धबंदीसाठी पाकिस्तान पायात शेपूट घालून धावत होता!”
डोळे बांधले, शिवीगाळ केली, सीमेवरील अधिकाऱ्यांबद्दल विचारले… बीएसएफ जवानाने सांगितला अनुभव
मणिपूरच्या चांडेल जिल्ह्यात झालेल्या चकमकीत १० दहशतवादी ठार
विरोधकांचे बुरखे फाटलेत त्याचे उत्तर कोण देणार ?
थरूर यांनी इशारा दिला की ट्रम्प यांची मांडणी काश्मीर मुद्द्याला निष्कारण आंतरराष्ट्रीय करते, ज्याला भारताने सातत्याने नकार दिला आहे.
ट्रम्प यांनी दावा केला होता की, त्यांनी दोन्ही देशांवर दबाव टाकून “पूर्ण आणि त्वरित शस्त्रसंधी” करण्यास प्रवृत्त करून एक “संभाव्य विनाशकारी अणु संघर्ष” टाळला.
१० मे रोजी भारत आणि पाकिस्तानने काही दिवसांच्या वाढत्या तणावानंतर लष्करी कारवाया थांबवण्याच्या निर्णयावर सहमती दर्शवली. ट्रम्प यांनी याला “शस्त्रसंधी” म्हटले, तर भारतीय सरकारने त्या शब्दाचा वापर टाळत केवळ गोळीबार थांबवण्याचा निर्णय असल्याचे स्पष्ट केले आणि “ऑपरेशन सिंदूर” सुरूच राहील हे स्पष्ट केले.
