30.6 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
घरराजकारणमहाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही

महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही

देवेंद्र फडणवीस यांची स्पष्ट भूमिका

Google News Follow

Related

राज्यातील एक गावही कर्नाटकाला जाणार नाही. वेळ आली तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ. पण कर्नाटकाला एकही गाव देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे . कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील जतवर दावा केल्याने सध्या एकच खळबळ उडाली आहे. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे .

महाराष्ट्रातील एकही गाव कुठे जाणार नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयात लढून बेळगाव, कारवार, निपाणीसह जी गावं आमची आहेत, ती सर्व गावे मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करू, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

फडणवीस म्हणाले, दोन्ही राज्यांच्या राज्यपालांची नुकतीच बैठक झाली होती. त्याआधी दोन्ही राज्यातील जलसंधारण मंत्र्यांचीही बैठक झाली होती. अशा बैठका झाल्याच पाहिजे. कारण आपण एकाच देशात राहतो. आपल्यात काही शत्रूत्व नाहीये. हा एक कायदेशीर वाद आहे. त्यामुळे चर्चा झाली पाहिजे.

हे ही वाचा : 

व्हासटऍप व्हिडीओ कॉल आला आणि तरुण अडकला जाळ्यात

बारसू रिफायनरीतून विविध टप्प्यांवर ५ लाख रोजगार निर्मिती

आसाम-मेघालय सीमेवर हिंसाचार, गोळीबारात ६ जणांचा मृत्यू  

नशीब बलवत्तर… न्यूझीलंडचे ‘टाय टाय’ फीश

फडणीस म्हणाले की , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सीमावादावर बैठक घेतली होती. त्यांनी कर्नाटकातील आपल्या लोकांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. काही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या लोकांना मदतच होणार आहे. एकही गाव कुठे जाणार नाही. उलट इतर गावेही आपण मिळवणार आहोत. बैठकीमध्ये सीमाभागातील मराठी बांधवांना कायदेशीर मदत करण्याचे ठरले होते. तसेच त्यांना नवीन योजना आणि सुविधांचा लाभ देण्यासंदर्भातही निर्णय घेण्यात आले होते. त्यामुळे आपणही काहीतरी करावे, या उद्देशाने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीच्या जत तालुक्यातील ४० गावांचा कर्नाटकात समावेश करण्याविषयीचे वक्तव्य केले असावे, असे फडणवीस यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा